शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सुपर स्पेशालिटीसाठी ‘सिव्हील’चे जूनपर्यंत स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 03:08 IST

नियोजित समितीत चर्चा : जिल्हा शल्यचिकित्सकांचे स्पष्टीकरण

ठाणे : येथील सिव्हील रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. त्यासाठी या रुग्णालयाच्या दोन्ही इमारती पाडण्यात येणार आहेत. तत्पूर्वी या रुग्णालय अन्यत्र स्थलांतरित करण्याची अपेक्षा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व्यक्त केली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी या रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास अनुसरून पालकमंत्र्यांनी या रुग्णालयाचे लवकरच स्थलांतर करून काम सुरू करण्यासाठी मंजुरीदेखील मिळवल्याचे सांगितले.सिव्हील रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी सुमारे चार ठिकाणांची यादी या बैठकीत चर्चेला आली. यामध्ये मनोरुग्णालयासह मुंब्रा-कौसा येथील महापालिकेची इमारत, माजिवडा, कशीश पार्क आदी ठिकाणी इमारती उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. पण, रुग्णाच्या सोयीनुसार या इमारतीत रुग्णालय सुरू करणे शक्य नसल्याचा सूरदेखील यावेळी ऐकायला मिळाला.वागळे इस्टेटमधील कामगार रुग्णालयाच्या इमारतीमध्ये सिव्हील रुग्णालय शिफ्ट करण्याचे आधी ठरले होते. मात्र, रुग्णांच्या सोयीनुसार ती जागा अयोग्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील गोरगरिबांचे या सिव्हील रु ग्णालयाकडे पाहिले जाते. पण, या रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसह त्याच्याशेजारील इमारत धोकादायक स्थितीत असल्यामुळे त्या वेळीच पाडाव्या लागणार असल्याचा मुद्दा जिल्हा नियोजन समितीमध्ये यावेळीही चर्चेला आला. रुग्णालय इमारतींच्या विविध विभागांतील प्लास्टर व स्लॅब निखळल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.निसर्ग हॉस्टेल, मनोरुग्णालयात होणार स्थलांतरच्रु ग्णालयाचे निर्लेखन करून नवीन इमारत उभारणी न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत येणार नसल्याचा मुद्दाही यावेळी चर्चेला आला.च्त्यामुळे जूनपर्यंत या रुग्णालयाचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्याच्या दृष्टीने महापालिकांच्या इमारतींची पाहणी सुरू केल्याचे या रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार सभागृहात स्पष्ट केले.च्या रुग्णालयाच्या धोकादायक इमारतीतील काही विभाग रुग्णालयासमोरील निसर्ग हॉस्टेलमध्ये तर, काही विभाग जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारातील ट्रेनिंग सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. पवार यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेhospitalहॉस्पिटल