शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिवा गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड: गावठी दारुसह पाच लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 19:55 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे डी आणि भरारी पथकाने दिव्यातील खाडी किनारी शुक्रवारी धाड टाकून एका बोटीसह गावठी दारु तसेच दारु निर्मितीच्या रसायनासह सामुग्री जप्त केली.

ठळक मुद्दे दिवा भागातील खाडी किनारी कारवाईदारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह ५ लाख ९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त१६४५ लीटर गावठी दारुसह बोटही हस्तगत

ठाणे : दिवा गावातील खाडी किनारी असलेल्या गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘डी’ विभागासह ठाण्याच्या भरारी पथकाने संयुक्तरित्या शुक्रवारी दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत दारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह पाच लाख ९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील , पी. पी. घुले, सहायक दुय्यम निरीक्षक एम. टी. वरुळकर तसेच जवान एस. डी. पवार, प्रदीप महाजन आणि शैलेश कांबळे तसेच भरारी पथकाचे निरीक्षक संजय कांगणे, दुय्यम निरीक्षक सुनिल देशमुख, जवान के. एस. वाजे आणि जी. के. तेलुरे आदींच्या पथकाने २ फेब्रुवारी रोजी रोजी दिवा गावातील खाडी भागात बेकायदेशीरपणे चालणा-या गावठी हातभट्टी दारु निर्मितीच्या वेगवेगळया तीन अड्डयांवर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास धाडसत्र राबविले. यामध्ये रसायनाने भरलेले २०० लीटर क्षमतेचे ७८ प्लास्टीकचे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे रिकामे २८ प्लास्टीकचे ड्रम, गावठी दारुने भरलेले ३५ लीटर क्षमतेचे ४७ प्लास्टीकचे ड्रम, एक होडी, रसायनाने भरलेला एक मोठा ढोल एक सतेले आणि एक मोटर इंजिन जप्त तसेच एक हजार ६४५ लीटर गावठी दारु आणि १५ हजार ६०० लीटर दारु निर्मितीचे रसायन असा सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त करुन नाश केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. धाडीची चाहूल लागताच खाडी परिसरातून दारु निर्मिती करणा-या चौघांनी पलायन केले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...................आठवडा भरात दुसरी कारवाईदरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने आठवडाभरापूर्वीच २९ जानेवारी रोजी डायघर भागातील देसाई गावातील खाडी किनारी धाड टाकून दारु निर्मितीसाठी लागणाºया रसायनासह चार लाख ८१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. शुक्रवारच्या कारवाईने दारुचा अड्डा चालविणाºयांचे मात्र चांगलेच दाबे दणाणले आहेत.

टॅग्स :thaneठाणेExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCrimeगुन्हा