शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

अंबरनाथच्या नागरिकांची आता कचऱ्याच्या वर्गीकरणातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 00:22 IST

प्रकल्पामध्ये बदलापूरचाही समावेश : घंटागाडी चालकांचा वाचणार त्रास

अंबरनाथ : स्पेनच्या कंपनीसोबत अंबरनाथमध्ये घनकच-यावर प्रक्रिया करणारी मोठी यंत्रणा उभारली जाणार आहे. या कचरा प्रकल्पासाठी लागणारा कचरा हा ३०० टनापेक्षा जास्त अपेक्षित असल्याने एकट्या अंबरनाथसाठी हा प्रकल्प शक्य नाही. त्यामुळे आता अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन शहरांची एकत्रित कचरा प्रकल्प केंद्र उभारण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे बंधनकारक करण्याचा प्रयत्न पालिकेचा सुरू आहे. मात्र नव्या प्रकल्पामुळे अंबरनाथकरांची समस्या सुटणार आहे. या प्रकल्पात ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याने नागरिकांना कचरा वेगळा करण्याची गरज भासणार नाही. तसेच घंटागाडी चालकांनाही आता तो त्रास कमी होणार आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ पालिकेच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी अधिकाऱ्यांसह स्पेनमधील घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली होती. या संदर्भात माहिती देण्यासाठी शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. खासदार शिंदे यांनी अंबरनाथमध्ये कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. स्पेनच्या कंपनीच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.अंबरनाथ शहरात रोज १५० टन कचरा एकत्रित केला जातो. मात्र प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या कचºयाची क्षमता ही किमान ३५० टन अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी बदलापूर शहरालाही सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बदलापूर शहरातून रोज सरासरी १०० टन कचरा एकत्रित केला जातो. त्यामुळे दोन्ही शहरांचा विचार करता सरासरी २५० टन कचरा एकत्रित होतो. त्यामुळे भविष्याची लोकसंख्या लक्षात घेऊन अंबरनाथमध्ये ३५० टन कचºयावर प्रक्रिया करता येईल एवढा मोठा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. या आधीही अंबनाथ आणि बदलापूरसाठी एकत्रित कचरा प्रकल्प राबविण्यावर विचार झाला होता. मात्र त्यावर एकमत न झाल्याने दोन्ही पालिकांनी स्वतंत्र प्रकल्प तयार करण्याच्या अनुषंगाने काम सुरू केले होते. मात्र शिंदे यांनी मध्यस्थी करून या दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेल्या पालिकांच्या डम्पिंग ग्राउंडवर प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

या संदर्भात अंबरनाथ पालिकेचे अधिकारी आणि कुळगाव-बदलापूर पालिकेचे अधिकारी यांच्या सोबत एक बैठकही झाली. या बैठकीत बलदापूर पालिकेने तत्वत: होकार दिला. तसेच बदलापूर पालिकेची साई वालिवली गावाजवळ १७ एकर डम्पिंगची जागा आहे तर अंबरनाथ पालिकेकडे जांभूळ गाव रस्त्यावर ३२ एकर जागा ही डम्पिंगसाठी प्रस्तावित आहे. या दोन्ही जागा अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या मध्यावर असल्याने दोन्ही पालिकांना या ठिकाणी प्रकल्प राबविणे शक्य आहे.या प्रकल्पासाठी सरासरी ८० ते ९० कोटींचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्पापैकी ५० टक्के खर्च ही संबंधित कंपनी करणार आहे. तर उर्वरित प्रकल्पाचा खर्च हा दोन्ही पालिकांना उचलावा लागणार आहे. या प्रकल्पावर निर्णय झाल्यास वर्षभराच्या आत हा प्रकल्प सुरू करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे नागिरकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे.अंबरनाथमध्ये सीएनडी प्रकल्पही राबविणारच्कचºयासोबत शहरातील इमारतीच्या बांधकामाच्यावेळी किंवा इमारत तोडल्यावर बाहेर पडणारे डेब्रिज ही मोठी समस्या आहे. शहरात ते कुठेही पडलेले असते. त्यावर कोणतीच प्रक्रिया होत नसल्याने त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाही तयार करण्यात येणार आहे.च्स्पेनच्या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्याचा विचार सुरु आहे. मात्र हा प्रकल्प राबवितांना आवश्यक असलेले डेब्रिज हे कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातून घेतले जाणार आहे. त्यासाठी इतर शहरांसोबत चर्चा करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.च् या प्रकल्पासाठी १० ते १५ कोटींचा अतिरीक्त खर्च अपेक्षित आहे. या डेब्रिजमधून वाळू, खडी, आणि दगडाची पावडर वेगळी करुन ती पालिकेच्या विविध विकास कामांमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथ