शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मोठया रकमेच्या आॅफरमुळेच सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या सिने अभिनेत्री

By जितेंद्र कालेकर | Updated: June 4, 2021 01:16 IST

हॉटेलमध्ये रेड पडू शकते. त्यामुळे कोणताही धोका न पत्करण्यासाठी ठाण्यातील एका उच्चभ्रू निवासी गृहसंकुलातच मॉडेलिंग आणि सिने अभिनेत्रींना मोठया रकमांचे अमिष दाखवून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविले जात होते.

ठळक मुद्दे निवासी संकुलात सुरु होता अनैतिक व्यवसायसाडे तीन लाखांमध्ये झाला दोघींचा सौदा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: हॉटेलमध्ये रेड पडू शकते. त्यामुळे कोणताही धोका न पत्करण्यासाठी ठाण्यातील एका उच्चभ्रू निवासी गृहसंकुलातच मॉडेलिंग आणि सिने अभिनेत्रींना मोठया रकमांचे अमिष दाखवून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविले जात होते. बुधवारी ठाण्यात या रॅकेटमध्ये पकडलेल्या सुनिलकुमार जैन याच्यासह तिघांनाही ७ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्यातील पाचपाखाडीतील एका गृहसंकुलातील हसीना मेमन ही महिला तिच्या स्वीटी (घर मालकीण) या भागीदार महिलेच्या घरात शरीर विक्रयासाठी काही मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींना तसेच महिलांचा मागणीप्रमाणे पुरवठा करते, अशी गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांना मिळाली होती. त्याच आधारे मुंब्रा भागात राहणाºया हसीना या दलाल महिलेकडे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका बनावट गिºहाईकाने दोन मॉडेलची मागणी केली. त्याबदल्यात तिने प्रत्येकीसाठी दोन लाखांची मागणी केली. तडजोडीअंती प्रत्येकीसाठी एक लाख ८० हजार म्हणजे तीन लाख ६० हजारांमध्ये ठरला. हा सौदा ठरल्यानंतर यातील अन्य एक दलाल सुनिलकुमार जैन (४२, रा. गोरेगाव, मुंबई) याच्या मार्फतीने दोन कथित अभिनेत्रींना मोठया रकमांचे अमिष दाखवून त्याठिकाणी बुधवारी दुपारी आणले. या तरुणी तिथे आल्यानंतर मोठया कौशल्याने गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव, योगेश काकड, उपनिरीक्षक कैलास सोनावणे, पोलीस हवालदार रवींद्र पाटील, तेजश्री शेळके आणि माधुरी जाधव यांच्या पथकाने सुनिल आणि हसीना या दलालांसह घरमालकीण स्वीटी या तिघांना अटक केली. अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोठया रकमा देऊन हेरायचे-ज्या सिने अभिनेत्रींना गेली अनेक दिवस चित्रपटांमध्ये कामाची संधीच मिळाली नाही. परंतू पैशांची गरज आहे. त्यांनाच मोठया रकमांचे अमिष दाखवून या रॅकेटमध्ये ओढण्याचे काम सुनिल करीत होता. या कारवाईमध्ये काही रोकड, निरोधाची पाकिटे, मोबाईल फोन आणि पर्स असा दोन लाख १४ हजार १५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात अशाच प्रकारे आणखी अभिनेत्री किंवा मॉडेलिंग करणाºया तरुणींनाही या सेक्स रॅकेटमध्ये ओढण्यात आले आहे का? याचाही तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी