शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सिंड्रेला चित्रपटाच्या द्विवर्षंपुर्ती निमित्त आठवणींना दिला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:02 IST

सोमवार ४ डिसेंबर रोजी ‘सिंड्रेला’ या मराठी सिनेमाच्या द्विवर्षंपुर्ती निमित्त या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रविवारी अभिनय कट्ट्यावर खास सादरीकरणांचे आयोजन केले होते.

ठळक मुद्दे‘आठवण सिंड्रेलाची’ या सदारांतर्गत सिंड्रेलाच्या आठवणींना उजाळा ‘बस आली’ ही एकपात्री सादरनव्याने प्रवेश घेतलेल्या कलाकारांचे स्वागत

ठाणे: अभिनय कट्ट्याची निर्मिती असलेल्या ‘सिंड्रेला’ या चित्रपटाला झालेल्या द्विवर्षपुर्ती निमित्त रविवारी ३५३ क्र मांकाच्या अभिनय कट्ट्यावर ‘आठवण सिंड्रेलाची’ या सदारांतर्गत सिंड्रेलाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.      प्रथेप्रमाणे प्रार्थनेनंतर ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी लक्ष्मण पवार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर अखिलेश जाधव या बालकलाकाराने ‘बस आली’ ही एकपात्री सादर करत कट्ट्याच्या कार्यक्र माला आरंभ केला. स्वप्नील काळे गणेश गायकवाड यांनी ‘आबुराव बाबुराव’ आणि आदित्य नाकती, पियुष भोंडे, वैभव चव्हाण, प्रशांत सकपाळ यांनी एका स्किटच्या माध्यमातून सिंड्रेलाचा प्रवास कसा झाला हे मांडले. यावेळी ध्वनीचित्र फितीच्या माध्यमातून सिंड्रेलाच्या काही ठळक घडामोडींचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घेतला. सिंड्रेला सिनेमाने फक्त कलाकारच नाही तर टेक्निशियन सुद्धा घडवले अशी प्रांजळ कबुली परेश दळवी याने दिली. परेश याने सिंड्रेला मध्ये आर्ट डिपार्टमेंट सांभाळले होते. या क्षेत्रासंबंधित काहीच अनुभव नसताना दिग्दर्शनाच्या टीम मध्ये सामील झालेल्या स्वप्नील काळेने सुद्धा आपले मत व्यक्त केले. आयुष्य कसं जगायचं याची शिकवण देणारा सिंड्रेलाने मला माझ्या करियरची सुद्धा वाट दाखवली असे त्याने म्हंटले तर वेगवेळ््या रिअ‍ॅलिटी शो मधून पार्श्वसंगीताची धुरा सांभाळणारा व सिंड्रेलाचा संगीत दिग्दर्शक किरण वेहेले म्हणाला की, सिंड्रेला हा सिनेमा खºया अर्थाने माझ्यासाठी टर्निंग पॉर्इंट ठरला.सिनेमाच्या पडद्यामागील अनेक गोष्टींचा उलगडा दिग्दर्शक किरण नाकती यांच्या मुलाखतीद्वारे झाला. ही मुलखात संकेत देशपांडे याने घेतली. यावेळी अधिकाधिक कलाकारांना चित्रपट सृष्टीत प्रवेश मिळावा म्हणून या सिनेमा कशा प्रकारे महत्वाचा ठरला याची उकल नाकती यांनी केली. तसेच सिनेमा घडतानाचे अनेक मजेदार किस्से त्यांनी प्रेक्षकांना रंगवून सांगितले. मुलाखतीच्या सदराअंती कट्ट्याचे कलाकार स्वप्निल काळे, प्रशांत सकपाळ, कदिर शेख यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी सिनेमातील प्रमुख कलाकार राणी म्हणजेच यशस्वी वेंगुर्लेकर ही सुद्धा उपस्थित होती. सरतेशेवटी कट्ट्यावर नव्याने प्रवेश घेतलेल्या कलाकारांचे अध्यक्षांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकcinemaसिनेमा