शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेट विक्री: पोलीस कारवाईच्या भीतीने पळाल्याने ठाण्यात विक्रेत्याने गमावला पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 22:12 IST

रस्त्यावर सिगारेट विक्र ी करणाऱ्या आशिष चांद पठाण (२४) याने पोलीस कारवाईच्या भीतीने पळ काढला. त्यातच समोरुन आलेल्या ट्रकने त्याला धडक दिल्याची घटना घोडबंदर रोडवर घडली. या अपघातात त्याचा पाय जायबंदी झाला आहे. मात्र,पोलीस कर्मचाºयाने पाच हजारांची लाच मागून त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटूंबीयांनी केला आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी मारहाण केल्याची तक्र ारपाच हजार रुपये मागितल्याचा केला आरोप ट्रक चालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रस्त्यावर सिगारेट विक्र ी करणा-या आशिष चांद पठाण (२४) याने पोलीस कारवाईच्या भीतीने पळ काढला. त्यातच समोरुन आलेल्या ट्रकने त्याला धडक दिल्याची घटना घोडबंदर रोडवर घडली. या अपघातात त्याचा पाय निकामी झाला असून याप्रकरणी ट्रक चालक अब्दुल सत्तार मकानदार (४०, रा. कारवार, कर्नाटक) याला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. दरम्यान, चहा सिगारेटची विक्री करणाºया आशिषकडे पोलीस कर्मचा-याने पाच हजारांची लाच मागून त्याला बेदम मारहाण करीत गाडी खाली ढकलून दिल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे पठाण कुटूंबियांनी केली आहे.कासारवडवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साईनगर येथील रहिवाशी आशिष चांद पठाण हा हायपर सिटी मॉलसमोर सिगारेट आणि गुटखा विक्री करतो. १३ आॅक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास कासारवडवली पोलीस आपल्यावर कारवाई करतील, या भीतीने तो पोलिसांना पाहून पळत सुटला. त्याच वेळी घोडबंदर रोडने जाणाºया एका भरघाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत आशिषच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा डावा पाय यात निकामी झाला. गंभीर जखमी झालेल्या आशिषला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ट्रक चालक अब्दूल हामीद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. * दरम्यान, या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या आशिषच्या वडिलांनी मात्र कासारवडवली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या अपंग मुलाकडून पोलीस हवालदार भदाणे यांच्यासह दोघे पोलीस पाच हजारांचा हाप्ता मागत होते. तो न दिल्यामुळे पोलिसांनी त्याला जबर मारहाण करीत गाडीच्या खाली फेकून दिले. या घटनेमध्ये त्याला आपला डावा पाय कायमस्वरूपी गमवावा लागला आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात