शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

भाईंदरच्या तरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू प्रकरण: पोलीस व महापालिका आयुक्तांना नोटीस

By धीरज परब | Updated: June 10, 2025 17:13 IST

राज्य मानवी हक्क आयोगाची कारवाई

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भाईंदरच्या स्व. गोपीनाथ मुंडे महापालिका क्रीडा संकुलातील तरणतलाव मध्ये १० वर्षांच्या ग्रंथ मुथा ह्या मुलाचा बुडून मृत्यू प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने मीरा भाईंदर महापालिका आयुक्त आणि मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्त यांना नोटीस बजावत ८ आठवड्यात कार्यवाहीचा संपूर्ण अहवाल स्वतः उपस्थित राहून सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

भाईंदर पूर्वेला न्यू गोल्डन नेस्ट जवळ असलेले महापालिकेचे क्रीडा संकुलच्या तरणतलावात २० एप्रिल रोजी ग्रंथ हा तरण तलावात पोहताना बुडून मरण पावला होता. सदर संकुल पालिकेने साहस चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस चालवण्यास दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र भाजपाशी संबंधित उपठेकेदार संकुल चालवत असल्याचे लेखी व तोंडी आरोप झाले आहेत.  

ग्रंथ याच्या मृत्यूच्या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होऊन नवघर पोलीस ठाण्यावर निषेध फेरी काढली होती. तर नवघर पोलिसांनी ठेकेदार, व्यवस्थापन वर्ग व ४ प्रशिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल केला. पालिका आयुक्तांनी देखील तिघा अधिकाऱ्यांची समिती बनवून त्याचा अहवाल सादर झाला आहे. मात्र कार्यवाही अजून झाली नाही. 

शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने ग्रंथच्या वडिलांसह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांची भेट घेऊन स्थानिक नेत्याच्या जवळील भाजपाच्या माजी पदाधिकारीचा संकुलात वावर असल्याचे सांगत त्याचा तपास तसेच आर्थिक व्यवहार तपासून आरोपी करण्याची आणि शिक्षेची मागणी केली होती. 

तर सत्यकाम फाऊंडेशनचे ऍड . कृष्णा गुप्ता यांनी महापालिका आणि पोलीस काटेकोर तपास करण्यासह ठोस कार्यवाही करत नसल्याने राज्य मानवी हक्क आयोगा कडे तक्रार केली होती.  आयोगाने त्याची दखल घेत पोलीस आणि पालिका आयुक्तांना नोटीस बजावून अहवाला सह स्वतः १९ ऑगस्ट रोजीच्या सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरdrowningपाण्यात बुडणे