शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिखलोली धरण पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:51 IST

गेल्यावर्षी मे महिन्यात चिखलोली धरणातील पाणीसाठ्यात रसायनांचे अंश आढळल्याने या धरणातील पाणीपुरवठा बंद केला होता. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले होते.

अंबरनाथ  - गेल्यावर्षी मे महिन्यात चिखलोली धरणातील पाणीसाठ्यात रसायनांचे अंश आढळल्याने या धरणातील पाणीपुरवठा बंद केला होता. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले होते. मात्र ना चौकशी ना कंपन्यांवर कारवाई झाली. त्यामुळे पुन्हा या धरणातील पाण्याला कारखान्यांचा धोका निर्माण झाला आहे.अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दतील चिखलोली धरणातून नियमित शहरातील पूर्व भागात सहा दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र या धरणाच्या सीमेवर अनेक रासायनिक कारखाने उभारण्याची परवानगी एमआयडीसीने दिल्याने या कारखान्यांचा धोका थेट धरणाला झाला आहे. या कारखान्यातील रासायनिक द्रव्य थेट धरणपात्रात जात असल्याने धरणातील पाणी दूषित होत आहे. गेल्यावर्षी हा प्रकार उजेडात आला होता. कारण दरवर्षीपेक्षा जास्त रसायन या पाण्यात आढळले होते. या धरणातील सर्व पाणी दूषित आणि घातक झाल्याने या धरणातून पाणी उचलण्यास बंदी घातली होती. तब्बल महिनाभर अंबरनाथ पूर्व भागाला या धरणातून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. धरणात थेट कंपनीतील रसायन येत असल्याने कंपन्यांवर कारवाईची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र या कंपन्यांवर कारवाई झालेली नाही. २१ मे रोजी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या धरणाची पाहणी केली होती. धरणाच्या पाण्यात रसायनमिश्रीत पाणी असल्याचे समोर आल्यावर त्यांनी संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र महिना उलटल्यावरही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मंत्र्यांचेच आदेश धाब्यावर बसविण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले होते. काहीतरी कारवाई दाखविण्याच्या प्रयत्नात प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कारखान्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत राहिले. सरकारी यंत्रणेच्या या कामचुकारपणाचा फटका हा चिखलोली धरणाला आणि त्यातील पाण्याला बसत आहे.पावसाळा संपत आल्याने आता पुन्हा या धरणातून अंबरनाथ शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. या धरणातील पाणी दूषित होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने जीवन प्राधिकरणाचे अधिकारीही प्रयत्न करीत आहेत. मात्र ज्या कंपन्यांनी गेल्यावर्षी धरणातील पाणी दूषित केले होते त्यांच्यावर कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने हे कंपनी व्यवस्थापन निर्धास्त झाले आहेत.चिखलोली धरणातील पाणी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होत नसल्याने या प्रकरणी मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी पुढाकार घेतला आहे. धरणातील पाणी दूषित करणारे कारखाने बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अंबरनाथ शहरातील पूर्वेकडील शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर, कैलासनगर, वडवलीचा काही भाग असा सुमारे पन्नास हजार लोकवस्तीला या धरणातून पाणीपुरवठा होतो.मनसेचा आंदोलनाचा इशाराही बाब लक्षात घेऊन लघु पाटबंधºयाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी पंधरा दिवसात संबंधित कंपन्यांवर चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी लकडे यांनी केली आहे. कारवाई न केल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेDamधरण