शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने शहापूरच्या ९७ गावांसह २५९ पाडे टँकरमुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 18:40 IST

‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरात असून ते जलसंपदा विभागाचे आहे. शेती सिंचनासाठी असलेल्या या धरणातील १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूरच्या टंचाईग्रस्त आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठीच्या प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवल्यामुळे भिमनवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारमानले

ठळक मुद्दे भावली धरणातील १२.६९ दलघमी. हक्काचे पाणी आरक्षित‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरातजो तालुका संपूर्ण मुंबईला पाणी पुरवतो त्यालाच पाणी नाही, असे विदारक चित्र पाहिल्यावर मुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका घेवून भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी

 भावली धरणातील १२.६९ दलघमी. हक्काचे पाणी आरक्षितलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ‘भावली धरण’ प्रकल्पातून शहापूर तालुक्यातील टँकरग्रस्त ९७ गावे २५९ पाड्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी सुमारे १२.६९ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंजुरी दिली आहे. या आदेशामुळे आता शहापूरच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यास यश मिळाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेवर मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांनी सांगितले.‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरात असून ते जलसंपदा विभागाचे आहे. शेती सिंचनासाठी असलेल्या या धरणातील १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूरच्या टंचाईग्रस्त आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठीच्या प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवल्यामुळे भिमनवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारमानले. याचा लाभ शहापूरच्या माळ व दांड सारख्या दुर्गम भागातील गावांबरोबर वाशाळ, खर्र्डी, कसारा, चेरपोली, शहापूर, आसनगाव अशा दोन लाख लोकवस्तीच्या गावेपाडे आदी ९७ गावे व २५९ आदिवासी पाड्यांना आता हक्काचे पाणी मिळणार आहे.धरणांचा तालुका असलेल्या शहापूर तालुक्यातील काही गावे अनके वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी या तालुक्यातील नागरिकांच्या व्यथांची दाखल घेत भावली धरणातील पाणी जलसंपदा प्रकल्पातून बिगर सिंचन पाणी आरक्षणाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने या तालुक्यातील गावपाड्यांची पाणी समस्या कायमची मिटणार आहे अशी माहिती भीमनवार यांनी दिली. शहापूर येथील कुणबी महोत्सवाला मुख्यमंत्री आले असता त्यावेळी पाण्यासंदर्भातील लोकांच्या तीव्र भावना त्यांनी लक्षात घेत ‘गुरूत्वाकर्षण पद्धतीने भावली धरणाचे पाणी आणण्यासंदर्भात त्वरित निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते.जो तालुका संपूर्ण मुंबईला पाणी पुरवतो त्यालाच पाणी नाही, असे विदारक चित्र पाहिल्यावर मुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका घेवून भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देणारा शासन निर्णय काढून शहापूरचा पाणी प्रश्न मार्गी लावला आहे. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा यांनी देखील वारंवार आवाज उठवून पाटपुरावा केला असता त्यास यश मिळाले आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद