शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
5
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
6
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
7
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
8
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
9
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
10
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
11
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
12
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
13
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
14
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
15
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
16
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
17
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
18
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
19
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
20
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन

मुख्यमंत्री २० तारखेला २७ गावांत

By admin | Updated: October 19, 2015 01:13 IST

कोणत्याही परिस्थितीत कल्याण-डोंबिवली मनपात भाजपाचा महापौर निवडून आणण्याचा ध्यास घेलेल्या भाजपाने २७ गावांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

चिकणघर : कोणत्याही परिस्थितीत कल्याण-डोंबिवली मनपात भाजपाचा महापौर निवडून आणण्याचा ध्यास घेलेल्या भाजपाने २७ गावांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मंगळवारी २० आॅक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २७ गावांत येत असून येथूनच ते भाजपाच्या जाहीर प्रचारांचा नारळ फोडणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता मानपाडास्थित प्रिमीअर मैदानात मुख्यमंत्र्यांची सभा असल्याची माहिती भाजपा ग्रामीणचे उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी दिली.विनोद काळण, रुपाली गोरे, सुनिता खंडागळे, शीतल चव्हाण, मोरेश्वर भोईर, राहुल पाटील, रमाकांत पाटील, नीता म्हात्रे, सुनिता पाटील, स्नेहल म्हात्रे, रेश्मा धमापूरकर, दमयंती वझे, जालंधर पाटील, इंदिरा तरे, लालचंद भोईर, पूजा पाटील, प्रशिला साळुंखे अशा १७ सर्वपक्षिय उमेदवारांना समितीने पुरस्कृत केले आहे. शिवसेने समोर समितीने आव्हान उभे केले असले तरी शिवसेनाही आपल्या रणनीतीनुसार गुप्त प्रचार करीत आहे. कोणाची किती ताकद आहे हे निकालावरून सष्ट होईल. रविवार हा चाकरमान्यांच्या सुट्टीचा दिवस असल्याने त्याचा फायदा घेण्यावर उमेदवारांनी भर दिला. सकाळपासून ते चाकरमान्यांच्या घरी भेट देत होते. सगळीच मंडळी आज भेटतात याचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांची पळापळ होती. १ नोव्हेंबरला मतदान असून त्या आधी १८ आणि २२ व २६ आॅक्टोबर असे तीनच दिवस चााकरमान्यांच्या सुट्टीचे असून त्यापैकी एक रविार गेला. सोमवार ते शनिवार असे सहा दिवस चाकरमानी घरात भेटत नाहीत. म्हणून चाकरमान्यांच्या भेटीगाठी घेण्यावर उमेदवारांनी भर देऊन आपल्यालाच मते देण्याचे आवाहन केले आहे.भाजपातर्फे जातीच्या कार्डाचा वापर>कल्याणमधील एक गठ्ठा मते मिळविण्यासाठी भाजपाने कोळी जातीच्या कार्डाचाही वापर केला आहे. कल्याण पश्चिमेतील कोळी समाजाचे प्राबल्य पाहता कोळी समाजाला भाजपाने ९ प्रभागांत उमेदवारी देऊन सहानभूती मिळविण्याचे राजकारण खेळले आहे. >प्रभाग -४ (कविता मिरकुटे), प्रभाग ६ (कल्पना गोडे), प्रभाग ७ (भरत) प्रभाग ९ (उपेक्षा भोईर), प्रभाग १० (प्रदीप भोईर), प्रभाग १३ (जनार्दन पाटील), प्रभाग १४ (योगीता पाटील), प्रभाग ४५ (रेखा चौधरी) आणि अपर्णा पाटील (प्रभाग १२) अशा नऊ कोळीबांधवांना उमेवारी दिल्याची माहिती कोळी समाजाचे राज्य उपाध्यक्ष देवानंद भोईर यांनी दिली.अखेर २७ गावांतला बहिष्कार फुटला गेल्याने रविवारी झालेल्या २७ गाव सर्वपक्षिय संरक्षण संघर्ष समितीने एकमताने उमेदवारांची यादी जाहीर करून शिवसेने समोर एकास एक उमेदवार दिला आहे. यामुळे २७ गावांतली निवडणूक आता रंगतदार होणार असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत. २१ प्रभागातील दोन बिनविरोध आणि दोन बहिष्काराग्रस्त प्रभाग असल्याने १७ प्रभागात शिवसेना आण संघर्ष समिती असा थेट समाना होईल.