शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री की व्हॉइसरॉय? हा बंद म्हणजे निव्वळ बालिशपणा; जितेंद्र आव्हाड यांनी लगावला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 05:35 IST

आनंदनगर चेकनाका येथून राष्ट्रवादीचे सुमारे पाच हजार पदाधिकारी, वारकरी मुंबईच्या दिशेने बसने रवाना झाले. तेव्हा आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पोलिसांना हाताशी घेऊन हा बंद करण्यात आला आहे. हा बंद म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. मोर्चा निघणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्था, वाहतूककोंडी होणार नाही, यासाठी पोलिसांना सूचना देणे गरजेचे होते. पण,  मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रिक्षाचालकांना मारहाण होत असेल, बस बंद केल्या जात असतील तर  ही दडपशाही आहे. मुंबईतील महामाेर्चा दडपण्यासाठीच हा बंद घडवून आणला. ते मुख्यमंत्री आहेत की व्हाइसरॉय आहेत, असा प्रश्न पडला असल्याचेही आव्हाड म्हणाले. 

महापुरुषांचा वारंवार केला जाणारा अवमान, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी, राज्यातील बेरोजगारी याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महामोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी आनंदनगर चेकनाका येथून राष्ट्रवादीचे सुमारे पाच हजार पदाधिकारी, वारकरी मुंबईच्या दिशेने बसने रवाना झाले. तेव्हा आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ठाण्याहून हजारो लोक मुंबईला निघाले आहेत. त्यांच्या मनात आक्रोश आहे. सरकारमधील नेतेमंडळी महापुरुषांबद्दल करत असलेले अवमानजनक वक्तव्य याविराेधात हा आक्रोश आहे, असे ते म्हणाले. ठाण्यात बंद पुकारून परिवहन सेवा बंद ठेवून, रिक्षाचालकांना दमदाटी करून नागरिकांना वेठीस धरण्यात आले. त्यांनी वारकऱ्यांसाठी हा संप केलेला आहे. पण खुद्द वारकरी हे आमच्यासोबत आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ९ वर्षांपूर्वीचे पुराण काढण्याचा हा प्रकार असून त्यांचे हे नवीन नाटक असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी उपस्थित वारकऱ्यांना ठाणे बंदविषयी छेडले असता, त्यांनी सर्व बनावट आहे. आम्हीही वारकरी आहोत. पिढ्यानपिढ्या वारकरी परंपरा जपत आहोत, असे सांगितले. यावेळी आव्हाड यांनी त्या वारकऱ्यांसमाेर नतमस्तक होऊन त्यांचे धन्यवाद मानले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड