शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मुख्यमंत्र्यांनी घेतली रिस्क, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दहीहंडीस्थळी रात्री 11.30 वाजता बोटीनं प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 09:55 IST

ठाणे शहरातील विविध दहीहंडी उत्सवानांना, टेंभीनाका येथेही आवर्जून उपस्थिती, भिवंडी असेल, दहिसर, मागाठाणे, घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवांना हजेरी लावली.

ठाणे - मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंनीदहीहंडी उत्सवात अगदी कार्यकर्त्यांसारखा सहभाग घेतल्याचं दिसून आलं. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील विविध दहीहंडी महोत्सवांना त्यांनी हजेरी लावली. यावेळी, गोविंदा बद्दल सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. तसेच, हिंदू सणांवरील निर्बंध आपण उठवले असून हे सण मोठ्या उत्साहात साजरे करा. आता दहीहंडी झाल्यानंतर गणपती आणि नवरात्री उत्सवही जल्लोषात साजरा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे, सगळीकडेच मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. 

ठाणे शहरातील विविध दहीहंडी उत्सवानांना, टेंभीनाका येथेही आवर्जून उपस्थिती, भिवंडी असेल, दहिसर, मागाठाणे, घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवांना हजेरी लावली. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव डोंबिवलीत रात्री 11.30 वाजता त्यांनी दहीहंडी उत्सवात उपस्थित राहत आपल्यातील कार्यकर्त्याचं उदाहरण दिलं. कारण, येथे पोहोचण्यासाठी त्यांनी रिस्क घेत चक्क बोटीतून प्रवास केला. डोंबिवली पश्चिमेकडे सम्राट चौकामध्ये फाउंडेशन तर्फे दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या उत्सवाला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली. 

मानकोली वेलेगाव ते डोंबिवली मोठा गाव गणेश घाटापर्यंत रात्री साडे अकरा वाजता एकनाथ शिंदे यांनी बोटीनं प्रवास करत कार्यक्रम स्थळ गाठलं. बोट चांगली होती म्हणून सुरक्षित पोहोचलोय. खरं म्हणजे कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहापुढे शेवटी नेत्याला देखील यावंच लागतं, अशी मिश्कील प्रतिक्रियाही यावेळी त्यांनी दिली. कार्यक्रमास मुख्यमंत्री येणार असल्याने डोंबिवली शहरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच डोंबिवलीत गेले होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकनाथ शिंदेंचं जोरदार स्वागत देखील करण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदे यांचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे आणि माजी नगरसेवक तथा महोत्सवाचे आयोजक दिपेश म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ आणि शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. 

दोन वर्षानंतर दहीहंडी उत्सव होत असून सरकारने देखील पूर्णपणे मोकळीक दिली आहेय अत्यंत उत्साहात सण साजरा होतोय याचं मला समाधान वाटतंय, आनंद होतोय, मी ज्या ठिकाणी  गेलो त्या त्या ठिकाणी प्रचंड उत्साह दिसून येतोय, असे एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे बोलताना, हे सरकार तुमचं आमचं सगळ्यांचं सरकार आहे. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, हे शिवसेना भाजपा युतीचं सरकार आहे. प्रत्येकाला वाटतं हे माझं सरकार आहे. आपलं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, हा फरक या गोविंदा उत्सवांमध्ये पाहायला मिळतोय, अनुभवला मिळतो ही चांगली बाब असल्याचंही ते म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDahi HandiदहीहंडीdombivaliडोंबिवलीChief Ministerमुख्यमंत्री