शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करण्यात धन्यता मानणाऱ्यांना शुभेच्छा; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By अजित मांडके | Updated: January 27, 2023 14:41 IST

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत किसन नगर येथील शाळेत शिंदे यांनी हजेरी लावली.

ठाणे: आमदार सोडून जातात, खासदार सोडून जातात. राज्यातील नव्हे तर विविध राज्यातील पदाधिकारी सोडून जातात, नातेवाईक सोडून जातात,  त्यावर आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करण्यात धन्यता मानतात अशा नेत्यांना माज्या शुभेच्छा आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत किसन नगर येथील शाळेत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकाराशी सवांद साधताना त्यांनी ही टीका केली.  मुठबगर लोकांमधून सर्व्हे केल्यावर  वस्तुस्थिती समोर येत नाही, माझ्याकडे देशभारतील आकडे आहेत. त्यांनी किती लोकांना भेटून आकडे काढले याची कल्पना नाही, ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये जे मिळालेलं यश आहे, त्याला मोठा आधार मिळतो, त्यामुळे यश कोणाचे आहे हे जनतेने दाखवून दिले आहे असा समाचार त्यांनी महाविकास आघाडीचा घेतला. मागील अडीच वर्षे प्रकल्प बंद होते. विकास कामे थांबली होती. परंतु आता आमचे सरकार आले आहे आणि आम्ही कामे करून दाखवत आहोत, टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आम्ही कामातून उत्तर देतो असेही ते म्हणाले. 

लोक प्रगती करणाऱ्याला मतदान करतील की काम थांवणाऱ्याला करतील हे जनता ठरवणार आहे, कोणाला मतदान करायचे याबाबत जनता सुज्ञ असल्याचे ही ते म्हणाले. आगामी महापालिका जिल्हापरिषद निवडणूक मिळणारे यश हा मोठा सॅम्पल सर्व्हे असेल, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. फक्त आकड्याची बेरीज केली की, २ चे ४ होत नाही, कोणाची आघाडी होईल कोणाची तुटेल हे सांगता येणार नाही, जनता कोणाला प्रतिसाद देईल हे लक्ष्यात येईल. देशात एनडीए सरकार चांगले काम करीत आहे हे तेच म्हणतात मग राज्यात काही वेगळे चित्र आहे का असा सवाल ही त्यांनी केला. त्यांना ओपिनियन पोलचा आनंद  घेउद्या, आम्ही त्यांचा आनंद हिरावून घेणार नाही. आगामी काळात सर्वेला उत्तर जनताच देईल असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांच्या टीकेला आरोपाला आम्ही कामांनी उत्तर देतो. लोकांना आरोपात काही इंटरेस्ट नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv Senaशिवसेना