शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता अटीच्या शिथीलतेसाठी कामगारांचे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे

By सुरेश लोखंडे | Updated: February 25, 2024 22:11 IST

सध्या या महापालिकेने गेल्या वर्षी कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या एक हजार १७८ जागा भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंबई महानगरपालिकचे सफाई आणि इतर तत्सम कामे करणारे चतुर्थश्रेणी कामगार  पदवी, पदव्युत्तर पदवी, एल.एल.बी., एल.एल.एम., अभियांत्रिकी, एम.बी.ए. पर्यंतेच शिक्षण घेऊनही सफाई, लिपीक पदाचे काम करणार्या कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी उच्चश्रेणीच्या रिक्त जागांसाठी परीक्षा दिली. पण गुणवत्तेत कमी पडल्यामुळे त्यांची संधी गेली. ती प्राप्त करण्यासाठी गुणवत्ता व वयाची अट शिथील करण्याची या शेकडो कर्मचाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थान गाठून या जाचक अटी शिथील करण्यासाठी साकडे घातले आहे.

सध्या या महापालिकेने गेल्या वर्षी कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या एक हजार १७८ जागा भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतल्या. हया परिक्षेसाठी दोन हजार कामगार बसले होते. या परीक्षेतील दोन जाचक अटींमुळे प्रशासनाला पुरेसे उमेदवार मिळाले नाही. परीक्षेच्या निकालानंतर एक अट शिथिल केलेल्यामुळे प्रत्यक्षात किमान ९९ गुण मिळालेल्या ८२९ उमेदवारांना नियुक्ती मिळत आहे ज्यामध्ये अनुर्तीण उमेदवारांचाही समावेश आहे, अशा अनुर्तीण उमेदवारांना उत्तीर्ण म्हणून मान्यता देऊन नियुक्ती देण्यास मंजुरी दिली आहे.  या किमान ९० गुणांच्या अटीमुळे ९० पेक्षा कमी गुण मिळालेले उमेदवार नियुक्ती पासून वंचित राहीले आहेत. या गुणवत्तेची अट शिथील करुन या पदी नियुक्ती देण्याची मागणी या कामगारांनी लावून धरली.

सर या एकूण ९९ गुणांच्या दुस-या अटीमुळे मागासप्रवर्गाच्या ३४९ रिक्त जागा असूनही प्रशासन उर्वरित उमेदवारांचा विचार करीत नाही. त्यामुळे ९० गुणांची अट शिथिल करून मागासप्रवर्गाच्या ३४९ रिक्त जागा भरण्यात याव्यात आणि उर्वरित उमदेवारांची कागदपत्रे पडताळणी करून पडताळणी सापेक्ष पात्र कामगारांना लिपिक पदावर सामावून घेण्यात यावी, या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला आहे.

टॅग्स :thaneठाणे