शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यांनी कितीही रडगाणं गायलं तरी, विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

By अजित मांडके | Updated: August 27, 2024 15:56 IST

आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले.

ठाणे - विरोधकांनी कतीही आरोप केले, कितीही रडगाणे गायले तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकणाथ शिंदे यांनी केला. टेंभी नाका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिघे साहेबांची दहीहंडी मानाची हंडी याठिकाणी शिंदे यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी हा दावा केला.

आम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आणि आता लाडका गोविंदा आदी सह इतर योजना आणल्या आहेत. मात्र यामुळेच विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यामुळे ते सारखे आरोप करत आहेत, त्यांच्या पाया खालची वाळू घसरली आहे. मात्र त्यांनी कितीही आरोप केले तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचा दावा त्यांनी केला. आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण, उत्सव हे निर्बंध मुक्त केले. गोविंदा आता प्रो गोविंदा केला, त्यांचा विमा काढला. मात्र प्रत्येक गोविंदाने हा खेळ खेळताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात जे काही काम केले त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा भगवा राज येईल असा विश्वास सिने अभिनेते गोविंदा यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कोणाला वाटलेही नव्हते की ठाण्यातून मुख्यमंत्री होईल. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या कामाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचत आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Dahi Handiदहीहंडी