शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
4
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
5
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
6
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
7
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
8
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
9
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
10
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
11
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
12
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
13
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
14
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
15
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
16
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
17
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
18
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
19
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
20
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अटलजींची शिकवण वैभवाकडे नेईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:25 IST

देशासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे. प्रत्येकाने अंतर्मनाने देशासाठी काही तरी केले पाहिजे ही जी शिकवण अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली ती घेऊन पुढे गेलो तर आपण देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ

ठाणे : देशासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे. प्रत्येकाने अंतर्मनाने देशासाठी काही तरी केले पाहिजे ही जी शिकवण अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली ती घेऊन पुढे गेलो तर आपण देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ , असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ठाण्यात व्यक्त केला.स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंत्ती निमित्त भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी गायक सुरेश वाडकर यांच्या स्वरातील स्वरवंदना या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही भावना यावेळी व्यक्त केली. भरी दोहपहरी मे अंधियारा... सुरज परछाईसे हारा...अंतर तमका नेह निचोडे, बुझी हुई बाते सुलगाये... आओ फिर से दिया जलाये... आओ फिर से दिया जलाये अशी अटलजींच्या कवितेच्या ओळी सादर करून पुन्हा परमवैभवापर्यंत नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.देशाला एक दिशा देण्याचे काम अटलींजीनी केले असल्याचेही त्यांनी सांगितले. कवी मनाचे जरी अटलीजी होते, ते कोमल हृदयाचे होते. परंतु, देशासाठी संकटे आल्यास ते कठोर निर्णय घेण्यासही मागे पुढे पाहत नव्हते असेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या वेळेस देशाला हिंदू ग्रोथ रेट म्हणून हिणवले जात होते, त्यावेळेस अटलीजींनी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आज मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणखी बळकट होत असल्याचेही त्यांनी सांगितले. अटलजींच्या कविता, साहित्य, विचार त्यांचे शब्द हे आजही अजरामर आहेत. त्यामुळे त्यांना अशा वेगळ्या पद्धतीने मानवंदना दिल्याचे कौतुक त्यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthaneठाणे