शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत पाच वर्षांत पडणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:16 IST

ठाणे : कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु , निधीची कमतरता ...

ठाणे : कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु , निधीची कमतरता असून वेळेत तिची दुरुस्ती झाली नाही तर ती पाच वर्षांत पडेल,असा धक्कादायक आरोप रुग्णालयाच्या डीन संध्या खडसे यांनी केला. सध्या तिची अवस्था भीषण असून भिंतीचे पोपडे पडणे, बुरशी लागणे, सफाईकामगार आणि सुरक्षारक्षकांची अपुरी संख्या यामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर असल्याचे सांगून त्यांनी आपल्याच प्रशासनाविरोधात आवाज उठवला.

या रुग्णालयातील डॉक्टरांनाच डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दुपारी १२ च्या सुमारास रुग्णालयाची पाहणी केली. तसेच आजाराने ग्रस्त असलेल्या डॉक्टरांचीही विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना खडसे यांनी कळवा रुग्णालयातील असुविधांचा पाढा वाचला.

रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्षया रुग्णालयात १७ विभाग असून याठिकाणी रोज ओपीडीला १६०० ते १८०० रुग्ण येत आहेत. दिवसाला २५ ते ३० विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहेत. तर २०० हून अधिक रुग्ण हे उपचारासाठी येथे दाखल होत असतात. परंतु, ही इमारत २५ वर्षांहून अधिक काळ जुनी आहे. दोन वर्षांपूर्वी तिचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यानसार ती धोकादायक स्थितीत आली असून तिची दुरुस्ती गरजेची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याचा ठपकाही त्यांनी प्रशासनावर ठेवला. भिंतीना रंग नाही, बुरशी लागलेली आहे, इतर अनेक असुविधा आहेत, कुठे पोपडे पडत आहेत. अशी विविध समस्या असून त्या सोडवल्या जात नाही. मात्र,दुसरीकडे काही मंडळींकडून या ठिकाणचे मेडिकल कॉलेज हे पांढरा हत्ती असल्याचा उल्लेख केला जात असून ते बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुरुस्तीसाठी जो निधी मिळतो तो सुद्धा तुटपुंजा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.अपुऱ्या सुविधा : मुलांसाठी होस्टेल नाही, एका एका रुममध्ये तीन ते चार जण राहत आहेत, डक्ट जुने आहेत, भिंती ओलसर झाल्या आहेत, त्यामुळे येथील डॉक्टर आजारी पडत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.सुरक्षारक्षकांची संख्याही कमीसफाईकामगारांची संख्या ४० ते ४५ ही तुटपुंजी असून सुरक्षारक्षकांची संख्याही १७२ आवश्यक असतांनाही केवळ ५० ते ६० सुरक्षारक्षक कार्यरत असून येथे चोरीची घटना घडल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.डेंग्यूचे रोज येतात तीन रुग्णयेथील कॅबलॅबबाबतही त्यांनी यावेळी आक्षेप घेतला आहे. पीपीपी तत्वावर हे काम केले जात असून त्याठिकाणी एसीमधून पाणी गळत असल्याने त्याचा त्रास डॉक्टरांना होत असल्याचेही त्यांनी सांगितले. रुग्णालयात रोज तीन रुग्ण हे डेंग्यूचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.अन्यथा आंदोलन करूछत्रपती शिवाजी महाराज रुग्णालायत ज्या काही असुविधा आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही प्रशासनाला सात दिवसांची मुदत देत आहोत. परंतु, त्यानंतरही त्यात सुधारणा झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन होईल.- मनोज शिंदे, शहर अध्यक्ष - काँग्रेसमेडिकल तीन वर्षांपासून बंदसर्वसामान्यांना औषधे मिळावीत म्हणून येथे मेडिकल स्टोअर असणे अपेक्षित आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून ते बंद आहे. परंतु, आता ते आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मोफत देण्याचा घाट घातला जात आहे.- विक्रांत चव्हाण, गटनेते, काँग्रेस