शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या हृदयात बसवा - बाबूराव कानडे यांचे ठाण्यात प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 3:05 PM

व्यास क्रिएशन्सतर्फे तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी बाबुराव कानडे उपस्थित होते.

ठळक मुद्देछत्रपती शिवराय ही आपली प्रेरणा आहे, शक्ती आहे - बाबूराव कानडे शिक्केकट्यारी, स्वराज्यसाक्षी, श्रीमहाभारत या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी केले प्रास्ताविक

ठाणे : महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. छत्रपती शिवराय ही आपली प्रेरणा आहे, शक्ती आहे. म्हणून शिवाजी महाराजांना आपल्या हृदयात बसवा. इतिहास वाचण्यापेक्षा तो अभ्यासणं आणि जाणून घेणं हे अधिक महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीत वाढलेले आणि राजमाता जिजाऊंच्या संस्कारात वाढलेेले  छत्रपती संभाजी यांचं शौर्यतेज प्रकट होत गेलं. त्यांच्याविषयीचा खोटा इतिहास प्रसारीत झाला हे आपलं दुर्देवं म्हणावं लागेल. म्हणून संपूर्ण मराठ्यांचा इतिहास जाणून घेताना या व्यक्तीरेखांना भावनिक पातळीवर समजून घ्या. हे जाणण्यासाठी महेश गुप्ते लिखित स्वराज्यसाक्षी आणि शिक्केकट्यारी ही पुस्तके दीपस्तंभ ठरतील, असे वक्तव्य ज्येष्ठ व्याख्याते ह.भ.प. यशवंत उर्फ बाबूराव कानडे यांनी केले.

व्यास क्रिएशन्स्तर्फे महेश गुप्ते लिखित शिक्केकट्यारी आणि स्वराज्यसाक्षी तसेच ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर लिखित श्रीमहाभारत या पुस्तकांच्या ऐतिहासिक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ लेखक आणि नाटककार अशोक समेळ, संत साहित्याचे गाढे अभ्यासक वामनराव देशपांडे, व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक श्री. वा. नेर्लेकर, व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वामनराव देशपांडे म्हणाले, महर्षी व्यासरचित श्रीमहाभारत हे महाकाव्य हा एक विश्वचमत्कार आहे. या महाकाव्याला आता पाच हजार वर्षे उलटून गेली. पण त्याची अलौकीकता जराही कमी झाली नाही. जगभरातल्या विद्वानांना या महाकाव्याच्या अभ्यासाची भुरळ पडली. ही सूड कथा नाही,तत्त्वज्ञानाला मोहिनी घालेल अशी भगवद्गीता यात प्रकट झाली आहे. मानवी आयुष्यावर चांदणं बरसवणार्‍या महाभारताला पर्याय नाही. आजच्या पिढीसाठी श्रीराम बोरकर यांनी नव्यानं दालन उघडलं आहे याचा वाचकांनी नक्की लाभ घ्यावा. ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांनी आपल्या प्रभावी शैलीत आपण लेखक ते नाटककार कसे झालो याचा प्रवास मांडला. एक साधी गोष्ट पण साहित्यात कसा इतिहास घडवून जाते याचे उदाहरणांसह केलेल्या मांडणीमुळे  रसिक मंत्रमुग्ध झाले. श्रीमहाभारत पुस्तक प्रकाशनासाठी बालगणेशाचे आगमन, शिक्केकट्यारी आणि स्वराज्यसाक्षी पुस्तकांच्या प्रकाशनासाठी तडफदार मावळे आणि मराठ्यांच्या सम्राज्ञी यांचा प्रवेश अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे रसिकांनी व्यास क्रिएशन्स्चे विशेष कौतुक केले. व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर आणि समीर गुप्ते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. लेखक महेश गुप्ते आणि श्रीराम बोरकर यांनी पुस्तकनिर्मितीबद्दल मनोगत व्यक्त केले. व्यास क्रिएशन्सचे मुद्रक सुबोध पटवर्धन, चित्रकार अनिल दाभाडे, सुधीर मुणगेकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. हर्षदा बोरकर यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई