शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पानेरी नदीत रासायनिक पाणी; चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:20 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश तहसीलदार कचेरीतच अडकले

- हितेन नाईकपालघर : बेकायदेशीर रित्या कंपनी उभारून त्यातील रासायनिक कारखान्यामधील प्रदूषित रासायनिक पाणी पानेरी नदीत सोडणाºया कंपन्या विरोधात जिल्हाधिकाºयां कडे केलेल्या तक्रारीला वर्षभराचा कालावधी उलटून गेला आहे. त्या कंपन्या विरोधात चौकशी करून कारवाईचे आदेश वर्षभरापासून तहसीलदार कार्यालयाच्या दप्तरात दाबले जात आहेत.जिल्हाधिकरी कार्यालयाला लागूनच असलेल्या दिवाण अँड सन्स उद्योग नगर, अल्याळी औद्योगिक क्षेत्रातील ड्युरीअन कंपनीच्या मालकांनी मोकळ्या जागेत पालघर प्लायवूड प्रॉडक्ट्स प्रा. ली. कंपनीला मशिनरी लावून उत्पादन सुरू करण्याची परवानगी दिली होती. प्लायवूड कंपनीने आपल्या मशिनरी लावीत उत्पादन सुरू करीत त्या उत्पादनातुन निघणारे प्रदूषित पाणी एका पाईपद्वारे चोरट्या पद्धतीने पानेरी नदीला जोडणाºया एका नाल्यात सोडले होते. माहीम ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाºया सोबत ड्युरिअन कंपनीत धाड टाकून भांडा फोड केला होता.तारापूर प्रदूषण मंडळाचे अधिकाºयांनी या प्रकाराचा १३ डिसेंबर २०१७ रोजी पंचनामा करून पालघर प्लायवूड कंपनीवर १८ डिसेंबर २०१७ रोजी ३३ अन्वये क्लोजर नोटीसची कारवाई केली होती. परंतु पालघर प्लायवूड कंपनीने ड्युरीअन कंपनीला आपल्या कंपनीच्या मोकळ्या जागेत कुठल्याही विभागाच्या परवानग्या न घेता कंपनी उभारणे, बेकायदेशीररीत्या विद्युत पुरवठा करणे, शासनाच्या सेल टॅक्स, इन्कमटॅक्स, ग्रामपंचायतीचा कर आदी महसूल बुडवणे अशी बेकायदेशीर कृत्य केल्याने दोन्ही कंपन्यांच्या मालकावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची तक्र ार जिल्हाधिकाºया कडे ४ एप्रिल २०१८ मध्ये करण्यात आली होती.जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी २४ जुलै रोजी २०१८ रोजी उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांच्या कडे कार्यवाही करून तक्र ारदारांना काळविण्याचे आदेश दिले होते तर उपविभागीय अधिकारी गजरे यांनी तहसीलदार महेश सागर यांच्या कडे हे प्रकरण पाठवले होते. या संदर्भात तहसीलदार कार्यालयाने काय कार्यवाही केली या बाबत तक्र ारदाराला आजही कळविलेले नाही.माहीम-वडराई गावकऱ्यांची जागृतीपानेरी वाचवा ची हाक देत हजारो माहिम-वडराईकर जनजागृती साठी दिवसरात्र फिरून आपल्या नदीला वाचवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशावेळी कुठल्याही विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या प्लांट उभारून त्या द्वारे घेतल्या जाणाºया उत्पादनातून निघणारे प्रदूषित पाणी पाईपलाईन द्वारे पानेरी नदीत चोरट्या पद्धतीने सोडणाºया दोन्ही कंपन्यांचे पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयाला देऊनही दोन्ही कंपन्यावर कारवाईचा बडगा का उभारला जात नाही या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनाला या जाब विचारला जात आहे.प्रदूषण मंडळाने त्या कंपनीवर क्लोजर नोटीस बजावली होती. त्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत पुरावे दिल्यास कारवाई करू!- डॉ.प्रशांत नारनवरे,जिल्हाधिकारी पालघर.दोन्ही कंपनीनी बेकायदेशीर कृत्य केली असून प्रदूषण करणारी पालघर प्लायवूड आणि त्यांना साथ देणारी ड्युरीअन कंपन्यांच्या एनओसी माहीम ग्रामपंचायतींनी रद्द कराव्यात.-निलेश म्हात्रे,पानेरी बचाव समिती

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण