शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक, कोणार्क बँक वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 13:33 IST

कोणार्क बँकेच्या सीईओ रमेश माखिजा व इतरावर २५ कोटी ६० लाखाची फसवणुक केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल झाला.

उल्हासनगर : कोणार्क बँकेच्या सीईओ रमेश माखिजा व इतरावर २५ कोटी ६० लाखाची फसवणुक केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल झाला. मुळ कागदपत्राचे बनावट कागदपत्र, सहया व स्टँपचा वापर करून, वेगवेगळया १६ कंपण्या उघडल्या. त्यावर कर्ज घेवून परस्पर काढून फसवणुक केल्याची तक्रारीत निर्मल भाटिया यांनी म्हटले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात कोणार्क बँक आहे. फियादी निर्मल भाटीया त्यांनी, त्यांचे मित्र सतिश हर्षलानी व महेश हर्षलानी यांना त्यांच्या ५ फर्म करीता ओव्हर डॉफट फॅसिलिटीची रक्कम ६ कोटीसाठी, कोणताही मोबदला न घेता मालमत्तेचे मुळे कागदपत्र कोणार्क बँके मार्फत भारत सहकारी बँक ठाणे येथे दिले होते. निर्मल भाटिया यांच्या मुळ कागदपत्राचा वापर कोणार्क बँकेचे सीईओ रमेश माखिजा यांच्यासह बँकेतील व बाहेरील सहकार्यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुळ कागदपत्राचे बनावट कागदपत्र, स्टँप,व सहया करून त्यांच्या नावाने उघडलेल्या वेगवेगळया १६ कंपण्याच्या खात्यातून, वर्किंग कॅपिटल ओव्हर डफट सुविधेद्बारे, त्या कंपण्यावर कोटयावधीचे कर्ज मंजुर केले.

निर्मल भाटीया यांच्या नावाने उघडलेल्या वेगवेगळया १६ कंपण्याच्या खात्यात कर्जाचे जमा झालेली २५ कोटी ६० लाखाची रक्कम. बँकेचे सीईओ रमेश माखिजा व इतरांनी काढून घेवून, फसवणुक केली. असी तक्रार भाटिया यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल केली. ५ मार्च २०१५ ते आजपर्यंत, हा प्रकार झाला. मध्यवर्ती पोलिसांनी निर्मल भाटिया यांच्या तक्रारीवरून कोणार्क बॅकेचे सीईओ रमेश माखिजा व इतर जणांवर २५ कोटी ६० लाखाची फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिम चौकशी व तपास मध्यवर्ती पोलिस करीत आहेत.चुकीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखलफियादी निर्मल भाटिया यांनी केलेली तक्रार खोटी असून पोलिसांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल करायला हवा होता. याप्रकाराने बॅकेची बदनामी होत असल्याची प्रतिक्रीया बॅकेचे नवे सीईओ ग्वालानी यांनी दिली. याबाबत वरिष्ठ स्तरावर दाद मागणार असल्याचे ग्वालानी म्हणाले.