शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सुटे पैसे मागण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:18 IST

एखाद्या व्यापाऱ्याची आधी रेकी करुन नंतर त्याला महिलेमार्फत फोन केल्यानंतर दोन हजारांच्या नोटांच्या बदल्यात पाचशेच्या नोटा मागून कोणत्याच नोटा न देता गंडा घालण्याचे प्रकार ठाण्यात वाढले आहेत.

ठळक मुद्देव्यवसायिकांना गंडाठाण्यात रुग्णालय परिसरात वाढले प्रकारचार ते पाच जणांची टोळी

ठाणे : सुटे पैसे मागण्याच्या बहाण्याने ठाण्यातील व्यावसायिकांना गंडा घालणारी टोळी शहरात कार्यरत असल्याची बाब उघड झाली आहे. एका महिलेसह चार ते पाच जणांचे हे टोळके पाचशेच्या नोटा मिळाल्यानंतर दोन हजारांच्या नोटा न देताच पसार होते. या टोळीला शोधण्याचे आता ठाणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.शहरातील कोणत्याही रुग्णालयाजवळील मोठा व्यापारी किंवा एखाद्या सराफाला एका महिलेचा फोन येतो. ‘मी या रुग्णालयात आहे. मला १० ते १५ तोळ्यांच्या बांगड्या गहाण ठेवायच्या आहेत. रुग्णालयात भरण्यासाठी पैशांची गरज आहे. माझ्याकडे दोन हजारांच्या ५० नोटा अर्थात एक लाख रुपये आहेत. त्याबदल्यात पाचशेच्या नोटा बदलून हव्या आहेत.’ हा कॉल करून संबंधित व्यापा-याला एखाद्या नामांकित रुग्णालयाचा पत्ता दिला जातो. संबंधित डॉक्टरचे नावही सांगितले जाते. प्रत्यक्षात व्यापारी पाचशेच्या नोटा घेऊन आल्यानंतर त्याला या रुग्णालयाच्या गेटवरच अडवले जाते. संबंधित डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाइकांनीच आपल्याला तुमच्याकडून पैसे घेण्यास सांगितल्याचे गेटवरील व्यक्ती सांगतो. फोनवर संभाषण करणारी महिला याठिकाणी आलेली नसते. तिथे आलेल्या व्यापा-याकडून पाचशेच्या सर्व नोटा घेतल्या जातात. नंतर दोन हजारांच्या नोटा घेण्यासाठी आत जाण्याचा बहाणा ही व्यक्ती करते. पण, दोन हजारांच्या नोटाही तो आणत नाही आणि पाचशेच्या नोटाही घेऊन तो पसार होतो.नौपाडा परिसरात गेल्या १५ दिवसांमध्ये अशा चार ते पाच घटना घटनांची नोंद झाली आहे. वागळे इस्टेट, वर्तकनगर, राबोडी, कापूरबावडी, कासारवडवली या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातही गेल्या १५ दिवसांमध्ये प्रत्येकी दोन ते तीन घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

नागरिकांनी किंवा व्यापा-यांनी अशा कोणत्याही एखाद्या अनोळखीच्या ताब्यात इतकी मोठी रक्कम देऊ नये. असे फोन करणा-यांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी.- संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे

टॅग्स :thaneठाणेfraudधोकेबाजीCrimeगुन्हा