शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने ठाण्यातील बेरोजगारांची फसवणूक ७० लाखांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 22:06 IST

नोकरीला लावण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक करणाऱ्या दत्तात्रेय ऊर्फ तुषार धुरी याच्याविरुद्ध आणखी तक्रारी वाढल्या असून त्याने तब्बल ४५ बेरोजगारांची ७० लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देसाडेनऊ लाखांचा ऐवज जप्तआरोपींच्या पोलीस कोठडीत वाढदोघांना मिळाली न्यायालयीन कोठडी

ठाणे : बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीला लावण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक करणा-या दत्तात्रेय ऊर्फ तुषार धुरी याच्याविरुद्ध आणखी तक्रारी वाढल्या असून त्याने तब्बल ४५ जणांची ७० लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. धुरीकडून आतापर्यंत नऊ लाख ४५ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबई महापालिकेमध्ये नोकरीच्या आमिषाने १४ बेरोजगारांची १८ लाख पाच हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०१८ रोजी दाखल झाली होती. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट -१ ने तपासाला सुरुवात केल्यानंतर ३४ बेरोजगारांची ५४ लाख ४७ हजारांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने दत्तात्रेय धुरी, राहुल केळकर, प्रकाश गायकवाड आणि अनिकेत राणे या चौघांना २७ सप्टेंबर रोजी अटक केली. त्यांना ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. रविवारी ठाणे न्यायालयाने प्रकाश आणि दत्तात्रेय यांना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर केळकर आणि राणे या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.ठाकरे यांच्या पथकाने सहायक आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीच बनावट ३६ नियुक्तीपत्रे, वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे, लॅपटॉप आणि प्रिंटर अशी सामग्री हस्तगत केली. केळकर याच्याकडून दोन लाख ५० हजार रुपये, राणेकडून ४५ हजारांची रोकड, तर धुरी आणि प्रकाश यांच्या डोंबिवलीतील घरातून पाच लाख ५० हजारांचा मुद्देमाल असा नऊ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील मुख्य आरोपी धुरी हा नेहमीच सुटाबुटात वावरायचा. त्याने उत्कृष्ट बीएमसी एचआर अधिकारी असे स्मृतिचिन्ह हातात घेऊन फोटोही काढला होता. त्याच्या कारवरही तसा लोगो त्याने लावला होता. त्याच आधारे तो अनेकांना भूलथापा मारायचा. आता पोलिसांनी अटक केल्यानंतर मात्र तो आपण त्या गावचेच नसल्याचा आव आणत आहे. फसवणुकीतील रोकड कोणाकडे दिली, कशामध्ये गुंतवणूक केली, ही माहिती देताना टाळाटाळ करत आहे. त्याची बँक खातीही तपासण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी