शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वकीलासह दुकानदाराला गंडा घालणाऱ्या भामटयाला ठाण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:01 IST

बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्डच्या आधारावर वकीलाच्या नावावर मोबाइलसाठी कर्ज काढून दुकानदार आणि वकीलाला गंडा घालणा-या दिवाकर जैसवाल (३८, रा. ठाणे) या ठकसेनाला ठाणे खंडणी विरोधी पथकाने ५ आॅगस्ट रोजी अटक केली आहे. त्याने आणखीही अशाच प्रकारे फसवणूकीचे प्रकार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलतीन महिन्यांनी झाली आरोपीला अटक

ठाणे : एका वकीलाच्या नावाने बनावट पॅन कार्ड आणि आधारकार्ड बनवून त्यावर मोबाइलसाठी कर्ज काढून या वकीलासह मोबाइलच्या दुकानदाराला गंडा घालणा-या दिवाकर बृजकिशोर जैसवाल (३८, रा. शांतीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता.ढोकाळी येथील रहिवाशी असलेले वकील निखील पुजारी (३५) यांच्या नावाचे तसेच दुस-याचा फोटो असलेले बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड दिवाकर याने बनविले होते. त्यानंतर त्यांचे वीज बिलही त्याने मिळविले होते. त्याच आधारावर आदित्य बिर्ला फायनान्स कंपनीकडून मोबाइलसाठी ११ हजार ९४ रुपयांचे कर्ज घेतले. त्या आधारे टेंभी नाका येथील आर. के. मोबाइल शॉप यांच्याशी संगनमत करुन त्याने १९ जून २०१८ रोजी नविन मोबाइल खरेदी केला होता. कर्ज असल्यामुळे त्याला मुळ खरेदी पावती मिळालेली नव्हती. तरीही त्याने तो अन्य एकाला अल्प किंमतीमध्ये विक्री केला होता. दरम्यान, या मोबाइल कर्जाबाबत अ‍ॅड. निखील पुजारी यांच्याकडे कर्जाचे हाप्ते भरण्यासाठी फायनान्स कंपनीने विचारणा केली. तेंव्हा आपण कोणतेही कर्जच घेतले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी २५ एप्रिल २०१९ रोजी फसवणूक प्रकरणी आरके मोबाइल शॉपचे मालक किसन सिंग आणि या दुकानातील आदित्य बिर्ला फायनान्स कंपनीच्या वतीने कर्जाचे काम करणारे त्यांचे कर्मचारी अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, निरीक्षक विकास घोडके यांनी गोपनीय माहितीच्या आधारे दिवाकर जैसवाल याला ५ आॅगस्ट रोजी ठाण्यातील शांतीनगर भागातून अटक केली. त्याने आणखीही अशाच प्रकारे चार ते पाच जणांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी