शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
5
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
6
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
9
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
10
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
11
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
12
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
13
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
14
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
15
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
16
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
17
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
18
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
19
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
20
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक करणाऱ्या भामटयाला ठाण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 6:20 PM

तुमच्या मुलाला किंवा मुलीला चित्रपटात तसेच टीव्ही मालिकांमध्ये भूमीका साकारण्याचे काम मिळवून देतो, अशी बतावणी करीत महाराष्टÑासह गोव्यातील शेकडो उदयोन्मुख कलाकारांकडून पोर्टफोलिओसाठी लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाºया संदीप पाटील या भामटयाला ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला ९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देमहाराष्टसह गोव्यातही गुन्हे दाखलपोर्टफोलिओ बनविण्याच्या नावाखाली उकळले पैसेडोंबिवलीतील एका तक्रार अर्जाने फोडली प्रकरणाला वाचा

ठाणे : चित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावाखाली उदयोन्मुख कलाकारांची आणि त्यांच्या पालकांची फसवणूक करणा-या संदीप महादेव व्हरांबळे उर्फ संदीप पाटील उर्फ सँडी (३२, रा. कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे) या भामटयास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याने राज्यभरातील १०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची १० ते १५ लाखांची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.डोंबिवलीतील रहिवाशी रविंद्र कुलकर्णी यांचा मुलगा अद्वैत याला सिनेमा, टीव्ही मालिका तसेच जाहिरातींमध्ये काम मिळवून देतो, अशी बतावणी करीत त्याचा पोर्टफोलिओ बनवावा लागेल. त्यासाठी ११ हजार रुपये द्यावे लागतील, असे संदीप पाटील याने सांगितले होते. कुलकर्णी यांना स्वत:च्या बँक खात्याचा क्रमांक देऊन त्या खात्यावर ११ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. ते त्यांनी जमा केल्यानंतरही कुलकर्णी यांना त्यांच्या मुलाचा पोर्टफोलिओ देण्यात आला नाही. तसेच त्यास चित्रपट, टीव्ही मालिका किंवा जाहिरातीमध्येही भूमीका करण्याचे काम मिळवून दिले नाही. शिवाय, त्यांचे ११ हजार रुपये देखिल परत केले नाही. याप्रकरणी कुलकर्णी यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्याकडे गाºहाणे मांडले. पवार यांनी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटकडे सोपविले. पोलीस उपायुक्त दीपक देवराज वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण शिंदे यांनी केलेल्या चौकशीमध्ये कुलकर्णी यांच्याप्रमाणे संदीप पाटील या भामटयाने आणखीही अशाच प्रकारे पैसे काढून सुमारे चार लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार संदीप पाटील याला ५ आॅगस्ट रोजी घोडबंदर रोड, कासारवडवली येथील ‘रोझा गार्डन’ या इमारतीमधील त्याच्या घरातून अटक करण्यात आली.............................महाराष्टÑासह गोव्यातही गुन्हे दाखलयातील भामटा संदीप पाटील याच्याविरुद्ध कोल्हापूर जिल्हयातील भूदरगड, करवीर, इस्पोली पोलीस ठाण्यात तसेच रत्नीगिरी जिल्हयातील रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील फरासखाना, नवी मुंबईतील वाशी तर गोवा राज्यातील पणजी पोलीस ठाण्यात १७ गुन्हे दाखल असल्याचीही माहिती चौकशीत उघड झाली आहे. याशिवाय, मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्हयातही तो अद्याप पसार आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी