शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पाठलाग करून ठाणे पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याला पकडले, सात लाखांचे सोने हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 22:42 IST

सोनसाखळी चोरट्यांमुळे पोलिसांसह सामान्य महिलाही हैराण असताना कापूरबावडी पोलिसांनी भिवंडीच्या पिराणीपाड्यात जाऊन महंमद जमाल सरफराज जाफरी (२१, रा. भिवंडी) याला जेरबंद केले आहे.

 ठाणे -  सोनसाखळी चोरट्यांमुळे पोलिसांसह सामान्य महिलाही हैराण असताना कापूरबावडी पोलिसांनी भिवंडीच्या पिराणीपाड्यात जाऊन महंमद जमाल सरफराज जाफरी (२१, रा. भिवंडी) याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सात लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून ठाणे आणि मुंबई परिसरांतील तब्बल २७ गुन्ह्यांची त्याने कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.भिवंडीच्या शांतीनगर भागात जाफरी हा आपल्या साथीदारासह येणार असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे २४ आॅक्टोबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रदीप भानुशाली, सहायक पोलीस निरीक्षक बी.सी. वंजारी आदींच्या पथकाने त्याला साथीदारासह पिराणीपाड्यातील मैदानात दुपारी ४ वा.च्या सुमारास घेरले. त्या वेळी पोलीस पथकावरच चाल करून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात निरीक्षक भानुशाली यांच्या डाव्या हाताला मार लागला, तर हाताचे बोटही फ्रॅक्चर झाले. तरीही, या झटापटीत त्यांच्या पथकाने त्याला पकडले. मात्र, त्याचा अन्य एक साथीदार फैजल इराणी हा मात्र या धुमश्चक्रीत पसार झाला. जाफरी हा ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने बनवलेल्या टॉप २० यादीतील सराईत सोनसाखळी चोरटा आहे. कोपरी, मानपाडा, कासारवडवली, मुलुंड, नवघर, विक्रोळी तसेच कापूरबावडी आदी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे २७ सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची त्याने कबुली दिली. यातील नऊ गुन्हे एकट्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या परिसरात केल्याची कबुलीही त्याने दिली. त्याच्याकडून आतापर्यंत सात लाखांचे २४ तोळे सोने हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला ३० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निरीक्षक बारावकर यांनी वर्तवली आहे. पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा