शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाई न करताच काढली बिले, संजय केळकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 01:05 IST

ठाणे पालिकेच्या हद्दीत पातलीपाडा परिसरात दोन वर्षे नालेसफाई न करता बिले काढण्याचा प्रकार झाल्याचा आरोप भाजपचे आ. संजय केळकर यांनी केला आहे.

ठाणे : ठाणे पालिकेच्या हद्दीत पातलीपाडा परिसरात दोन वर्षे नालेसफाई न करता बिले काढण्याचा प्रकार झाल्याचा आरोप भाजपचे आ. संजय केळकर यांनी केला आहे. मागील तीन वर्षांपासून नाले सफाईत भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहेकळव्यात दोन वर्षांपूर्वी नाल्याशेजारी राहणाऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे. कळव्यातील वाघोबानगर, कौसा येथील कादर पॅलेस, ठाणे शहरातील गोकुळनगर, वृंदावन, आनंद पार्क, आझादनगर एक, केसल मिल परिसर, बाळकूम पाडा क्र. १, महागिरी कोळीवाडा, मुंब्रा जामा मशिद येथे नाले तुंबून पाणी रहिवाशांच्या घरात शिरले होते. त्यांनतर महासभेत नगरसेवकांनी एकच हल्लाबोल केला होता. त्यावेळी अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण पुढे नालेसफाईच्या कामात हलगर्जी करून लोकांचे संसार उद्ध्वस्त करणाºया या ठेकेदारांच्या बिलाची रक्कम मात्र अदा करण्यात आली. या ठेकेदारांवर कारवाई तर सोडा, पण अशा ठेकेदारांची यादीही पालिकेच्या घनकचरा विभागाकडे नाही. अशा ठेकेदारांची नावे काढून त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांना पुन्हा नाले सफाईची कामे मिळणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे होते; पण पालिकेच्या घनकचरा विभागाने अशी काळजी घेतलेली नाही.नाले सफाईच्या कामांत हलगर्जी करणाºया ठेकेदारांची काळी यादीच घनकचरा विभागाने तयार केली नाही. परिणामी दोन वर्षांपूर्वी कामात हलगर्जी करणाºया ठेकेदारांनाच पुन्हा कामे मिळाली. नाले सफाई न झाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर प्रशासनाने कामात हलगर्जी करणाºया ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन मला दिले होते; पण ते पाळले गेले नाही, असे केळकर यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका