शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘गण गण गणात बोते’चा मंत्रघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:51 IST

संडे अँकर । गजानन महाराज प्रकट दिन, कल्याण-डोंबिवलीमध्ये विविध कार्यक्रम

डोंबिवली : श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शहरामध्ये शनिवारी सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम झाले. ‘गण गण गणात बोते’ या भक्तिमंत्राने अवघे वातावरणच भारून गेले होते. विविध ठिकाणी झालेल्या सोहळ्यांमध्ये भाविकांनी सहभागी होऊ न गजानन महाराजांचे दर्शन घेतले. कल्याणमध्ये बेतूरकरपाडा आणि पारनाका येथील गजानन महाराजांच्या मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी झाली होती.

श्री गजानन महाराज सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पूर्वेकडील उपासना केंद्र आणि सर्वेश सभागृहामध्ये श्री गजानन महाराज पादुकांवर लघुरुद्राभिषेक, स्तोत्रांचे पठण, ह.भ.प. मंजूषा भाभे यांचे कीर्तन, आरती, विष्णुसहस्रनामपठण, नादब्रह्म भक्तिगीत मंडळाचे भजन, पारायण, अभिषेक असे पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पडले. उपासना केंद्रात दुपारच्या आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. साडेचार हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तर दिवसभरात १० हजार नागरिकांनी श्रींचे दर्शन घेतले. शुक्रवारी सायंकाळी श्रींचा मुखवटा आणि पादुकांची पालखी काढण्यात आली. पूर्वेतील स्वयंवर सभागृह, शास्त्री सभागृह येथेही उत्सव करण्यात आला. पश्चिमेतील मानव उत्कर्ष समाजसेवा मंडळातर्फे महात्मा फुले रोडवरील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात गीतापठाण, रु द्रपठण, गणपती अथर्वशीर्षपठण, गजानन प्रार्थना स्तोत्र, गजानन विजयग्रंथांचे पारायण, श्रीसूक्तपठण आदी विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी झाले.काकडआरती, पालखी सोहळाडोंबिवली पश्चिम, जुनी डोंबिवली गाव येथील गजानन छाया बंगला येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा पार पडला. पारंपरिक पद्धतीने श्रींची महापूजा, अभिषेक आणि पालखी सोहळ्यानंतर सोनारपाडा येथील ह.भ.प. गणेशबुवा यांचे कीर्तन झाले. पश्चिमकडील श्री गजानन महाराज कृपा सेवा संस्था, गरिबाचावाडा येथील राजीव गांधी उद्यानाशेजारी असणाऱ्या गजानन महाराज मंदिरात पहाटे काकडआरती, अभिषेक आणि महापूजेनंतर पालखी सोहळा झाला. 

टॅग्स :thaneठाणेGajanan Maharajगजानन महाराज