शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

लोकलमधील आसनव्यवस्थेत बदल : ३२ ऐवजी १४ प्रवाशांसाठीच आसन सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:40 IST

मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे पुर्वी ज्या आसनांवर ३२ प्रवाशी बसुन प्रवास करायचे आत्ता त्याच आसनांवर केवळ १४ च प्रवाशी बसुन प्रवास करत आहेत.

ठळक मुद्दे कसारा, नेरळ, बदलापूर, अंबरनाथच्या प्रवाशांना त्रास जुनी आसनव्यवस्थाच चांगली

डोंबिवली: मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे पुर्वी ज्या आसनांवर ३२ प्रवाशी बसुन प्रवास करायचे आत्ता त्याच आसनांवर केवळ १४ च प्रवाशी बसुन प्रवास करत आहेत.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन लांब पल्याच्या उपनगरीय लोकलच्या प्रवाशांना सुरुवातीच्या स्थानकापासुनच ठाणे कल्याण पुढील रेल्वे स्थानकापर्यंत उभे राहुन प्रवास करावा लागत आहे. आसनावर बसलेल्या कुणी सहप्रवासीही लांबचा प्रवास असल्याने सहप्रवाशांना बसण्यासाठी जागा देत नसल्याचा अनुभव येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सीएसएमटी येथून निघालेल्या लोकलमध्ये आभावानेच प्रवासी घाटकोपर,ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान सहप्रवाशांना बसण्यासाठी जागा देतात. अन्यथा प्रवाशांना अडीच ते तीन तास ताटकळत प्रवास करावा लागत असल्याची खंत कर्जत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर गंगावणे यांनी व्यक्त केली. असे ताटकळत प्रवास करावा लागत असेल तर हजारो प्रवाशांना अल्पावधीतच शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करावा आणि तातडीने बदल करावा असेही ते म्हणाले. मध्य रेल्वे प्रशासनाने उपनगरीय लोकल गाड्यांमधिल आसनव्यवस्था बदलण्याअगोदर दुरवरील रेल्वे प्रवाशांचा विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. तरी, मध्य रेल्वे प्रशासनाने ३२ प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल करुन ती १४ प्रवाशांची केलेली आहे, त्या सर्व उपनगरीय लोकल गाड्या ह्या केवळ कमी अंतरावरील प्रवासाकरताच चालवाव्यात. सीएसएमटी-कुर्ला मार्गावर तसेच कर्ला-ठाणे मार्गावर अशा लोकल सोडल्यास प्रवाशांची फारशी गैरसोय होणार नाही, पण कर्जत-कसारा पर्यंत आणि तेथून सीएसएमटीपर्यंत असा प्रवास करावा लागणार म्हणजे मरण यातनाच असल्याची प्रतिक्रिया कर्जत, कसा-याच्या प्रवाशांमधून व्यक्त झाली. ज्येष्ठ नागरिकांसह गरोदर माता, विद्यार्थी यांच्यासह शारिरीक त्रास असलेल्या प्रवाशांना होणा-या त्रासाचाही रेल्वे प्रशासनाने विचार करायला हवा असेही मत व्यक्त झाले. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीKarjatकर्जतdombivaliडोंबिवली