शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप राज्यात २०० हून अधिक जागा जिंकणार: चंद्रशेखर बावनकुळे

By अजित मांडके | Updated: November 5, 2022 15:10 IST

कितीही पक्ष एकत्र आले तरीही आमचाच विजय होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे ध्येय आहे. असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात केलं.संघटनामक दोऱ्याच्या निमित्ताने बावनकुळे हें शनिवारी ठाण्यात आलें होतें. तेव्हा त्यांनी संयोग मंदिर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

भारतीय जनता पार्टी हा राज्यातला  पहिला क्रमांकाचा पक्ष आहे .पण आम्हांला पक्षाची ताकद राज्यात 51टक्के इतकी वाढवायची. परिणामी कितीही पक्ष एकत्र आलें तरीही आमचाच विजय होईल यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यादृष्टीने आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार  प्रत्येक बूथवर 18 वर्षावरील किमान नऊ मतदाराची नोंद करणे. तसेच   महाविकास आघाडीचे पंचवीस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश व्हावा. असें लक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही  जोडी राज्याच्या विकासासाठी 18 तास काम करतायेत .तर यापूर्वीचे मुख्यमंत्री  मागील अडीच वर्षापैकी 18महिने मंत्रलयात गेले नाहीत. असा टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 

राज्यात मागील अडीच वर्षे पोषक वातावरण नव्हतं. पण आता शिंदे आणि फडणवीस दोघेही मोदींच्या नेतृत्वाखाली  रात्रंदिवस काम करत आहेत. पुढील काळात मागील अडीच वर्षात राज्याचे जें नुकसान झालं  तें  भरून काढण्याचं काम हें सरकार करेल. असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.आगामी  2024  च्या  विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांच्या  200 हून अधिक जागा जिंकण्याचे. तर लोकसभेत 45 जागा जिंकण्याचं  आमचं लक्ष  आहे. येणाऱ्या काळात तळागाळातील प्रश्न सोडविण्यासाठी  प्रयत्न करून शिंदे फडणवीस सरकार चं काम लोकांपर्यंत पोहचवू. तर आपल्या या दोऱ्याच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या समस्या आपण सरकार पर्यंत पोहचवू असंही बावनकुळे म्हणाले.

भाजपकडे लोकांचा कल वाढत आहे.2024मध्ये महाविकास आघाडीला निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार मिळणार नाही. इतके भाजपात  प्रवेश होतील. असा आशावाद बावनकुळे यांनी व्यक्त केला. तर आगामी महापालिका निवडणूकांच्या संदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा आणि त्यांची मते जाणून घेऊन  निर्णय होईल. मात्र विधानसभा लोकसभा निवडणुकीत निर्णय झाला असून  शिंदे भाजपा गटाची युती पक्की आहे. ज्या ज्या ठिकाणी शिंदे गटाबरोबर युतीचा निर्णय होईल तिथे त्यांच्या मागे पूर्ण ताकद उभी करू.असं बावनकुळे म्हणाले. 

आजच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कधी होणार हें कोणीच सांगू शकतं नाही. या निवडणुकांचा आज  कुठे वासच नाही.तसेच शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेली भेट ही वेगळ्या  कारणासाठी असेल. पण काहीजण मुद्दामहून त्या भेटीची  वेगळी चर्चा करतात. यापूर्वी एकदा कपट कारस्थान झालं होतं.उद्धव ठाकरे यांनी जी बेईमानी केली त्याचा बदला एकनाथ शिंदे यांनी घेतला.असं बावनकुळे म्हणाले. 

आम्हाला कोणाचेही  आमदार फोडायचे गरज नाही.राहूल गांधी यांची  भारत जोडो यात्रा  कार्यकर्त्यांनी नव्हे तर नेत्यांनी हायजॅक केली आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. एकीकडे ही यात्रा महाराष्ट्र येत असतांना येथील  काँग्रेसचे नेते भाजपात प्रवेश करतायेत. येत्या काही दिवसांत मोठे नेते प्रवेश करतील. या यात्रेत पक्ष वाढत नसून तो फुटतो आहे.अशी खिल्ली ही बावनकुळे यांनी उडवली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे