ठाणे : सत्ताधारी शिवसेना आणि ठाणे महानगर पालिका प्रशासनाने कधी विकासकांच्या फायद्यासाठी तर कधी मेट्रो रेल्वेसाठी सुमारे तीन हजार वृक्षांची कत्तल करण्याचा ठराव पारीत केला आहे. त्याला उत्तर म्हणून ठाणे शहराच्या विविध भागात सुमारे ९ हजार वृक्षांचे स्वखर्चाने रोपण करु न ते वाढविण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धापन दिनाच्या अनुषंगाने सोडला आहे. त्याची सुरु वात सोमवारी अय्यपा मंदिरामागील डोंगरावर झाडांची लागवड करु न केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस तथा जेष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या उपक्र माला सुरु वात करण्यात आली. अय्यप्पा डोंगराच्या मागे असलेल्या वनखात्याच्या डोंगरावर सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी १०० झाडांचे रोपण केले. तसेच, ही झाडे जगवण्याची शपथही घेतली. या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, ठाणे महानगर पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेने संगनमत करु न ठाणे शहरातील पर्यावरणाला धोका निर्माण केला आहे. ठाणे शहरात सत्ताधारी आणि प्रशासन बेलगाम वृक्षतोड करीत आहे. कधी मेट्रोच्या नावावर तर कधी विकासकांच्या फायद्यासाठी. गेल्याच महिन्यात ३ हजार झाडे ठाणे शहरात तोडण्यात आली. सोमवारी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी प्रण घेतला आहे की ९ हजार झाडे आम्ही या ठाणे शहरात लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तीन हजारांच्या वृक्षकत्तलीला राष्ट्रवादीचे ९ हजार वृक्षारोपणाने दिले पालिकेला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 17:29 IST
एकीकडे ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने शहरातील तीन हजार वृक्ष तोडीला परवानगी दिली असतांना, त्याला आता सडेतोड उत्तर राष्ट्रवादीने दिले आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून पहिल्या टप्यात सोमवारी १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
तीन हजारांच्या वृक्षकत्तलीला राष्ट्रवादीचे ९ हजार वृक्षारोपणाने दिले पालिकेला आव्हान
ठळक मुद्देशहराच्या विविध भागात करणार ९ हजार वृक्षांची लागवडवृक्ष लागवडीनंतर घेतली शपथ