शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:45 IST

एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा खून केल्यानंतर त्याचे प्रेत गोणीत भरून ते वागळे इस्टेट भागातील बुश कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या निर्जनस्थळी टाकण्यात आले होते.

ठाणे : एका तरुणाचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचे प्रेत वागळे इस्टेट येथील एका बंद कंपनीच्या बाजूला टाकले होते. या घटनेला दोन आठवडे उलटूनही खुन्यांचा किंवा मृतदेहाचा कसलाच छडा लागलेला नाही. त्यामुळे या खुनाचा तपास लावणे, हे आता ठाणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा खून केल्यानंतर त्याचे प्रेत गोणीत भरून ते वागळे इस्टेट भागातील बुश कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या निर्जनस्थळी टाकण्यात आले होते. ४ मे रोजी घडलेल्या या घटनेचा अद्यापही छडा लागलेला नाही. दरम्यान, वागळे इस्टेट पोलिसांच्या दोन आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या चार अशा सहा पथकांकडून या खुनाचा समांतर तपास करण्यात येत आहे. खून करणाऱ्यांसह मृतदेहाच्या ओळखीबाबत दोन आठवडे उलटूनही काहीच थांगपत्ता लागलेला नाही. गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांच्या पथकाने आतापर्यंत बुश कंपनीपासून संपूर्ण वागळे इस्टेट, श्रीनगर परिसरातील ३०० ते ४०० सीसीटीव्हींची तपासणी केली. तसेच अनेक संशयितांची चौकशी केली. तपास करणाºया सहाही पथकांनी ५० ते ६० जणांकडे चौकशी करूनही काहीच हाती लागलेले नाही. अनेक ठिकाणी रहिवासी बाहेरगावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गेल्या दोन आठवड्यांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३५ आणि मुंबईतील १०८ पोलीस ठाण्यांपैकी एकाही पोलीस ठाण्यात या वयोगटातील व्यक्ती बेपत्ता असल्याबाबतची तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. जर अशी एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्याबाबत किंवा अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्यास त्यादृष्टीनेही तपास करणे सोपे जाईल, असेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले.मिळालेल्या मृतदेहाचीही ओळख न पटल्याने या खुनाच्या तपासातील गुंतागुंत आणखीनच वाढली आहे. जरी हे आव्हान असले, तरी आम्ही हे खून प्रकरण लवकरच उघड करू, असा दावा आता वागळे इस्टेट पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारीही करत आहेत.खबऱ्यांना माहिती नाहीखबºयांकडूनही माहिती मिळवूनही काही हाती न लागल्यामुळे वागळे इस्टेट भागात हा मृतदेह अन्य भागांतून कोणी आणून टाकला का, हे गूढ उकलणे आव्हान ठरले आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा