शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

१२० कोटी वसुलीचे आव्हान; गौणखनिज स्वामित्वधनाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:32 IST

रेतीउपशासह दगडखाणी बंद

- नारायण जाधव ठाणे : रेतीउपसा आणि दगडखाणी बंद असल्याने महसूल व वनविभागाने २०१८-१९ या वर्षाकरिता दिलेले १२० कोटी रुपये रॉयल्टीवसुलीचे उद्दिष्ट कसे गाठायचे, असा प्रश्न ठाणे जिल्हा प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.तिजोरी रीती असल्याने महसूल विभागाने राज्यातील सहा प्रशासकीय विभागांना गौणखनिजांच्या उत्खननापासून २४०० कोटी रुपये रॉयल्टीवसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. यात कोकण विभागाला ५१६ कोटींचे उद्दिष्ट दिले असून यात ठाणे जिल्ह्याला १२० कोटी, पालघर ८० कोटी, रायगड १३० कोटी, तर मुंबई शहर २५ कोटी आणि उपनगर जिल्ह्यासाठी ६१ कोटींचे उद्दिष्ट आहे. रत्नागिरी ५५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४५ कोटींचे उद्दिष्ट आहे. ठाणे आणि रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात दगडखाणी आहेत. रेतीउपसाही मोठ्या प्रमाणावर चालतो. याच विभागात विशेषत: एमएमआरडीए क्षेत्रात रस्ते, मेट्रो प्रकल्पांसह अनेक बिल्डरांचे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. पंतप्रधान आवास योजनेचीही कामे सुरू आहेत. त्यासाठी कोकणात पायाभरणीसाठी खोदकाम करण्यात येत असून मातीचे उत्खनन करण्यात येत आहे.ठाण्यासमोर पर्यावरणवाद्यांच्या अडचणीपर्यावरणवादी संस्था, हरित लवादाच्या निर्बंधामुळे ठाणे जिल्ह्यात रेतीउत्खनन बंद आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टा अर्थात नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाणी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत.यामुळे रेती आणि बॉक्साइट या प्रमुख दोन गौणखनिजांपासूनच्या रॉयल्टीपासून मिळणारा मोठा महसूल मिळेनासा झाला आहे.यामुळे शासनाने निश्चित केलेले १२० कोटी रुपये महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट कसे गाठायचे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.विकासकामांमुळे रायगडचा मार्ग सोपारायगड जिल्ह्यात सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. त्यासाठी डोंगर कापण्यापासून धावपट्टीची भरणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेती, खडी, मातीचा वापर करण्यात येत आहे. शिवाय, अनेक विकासकांचे मोठमोठे प्रकल्प त्या भागात आकार घेत आहेत. जेएनपीटीचा विस्तार होत असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात गौणखनिजांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे रायगड जिल्ह्यास दिलेले १३० कोटींचे उद्दिष्ट ठाण्याच्या तुलनेत सोपे होणार आहे.शासनाने दिलेले १२० कोटींचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासन कोणत्याही परिस्थितीत साध्य करीलच, किंबहुना ते जास्त वसूल करण्याचा प्रयत्न राहील.’’- डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी

टॅग्स :sandवाळूthaneठाणेRevenue Departmentमहसूल विभाग