चक्री भजन स्पर्धा

By admin | Published: October 14, 2015 02:12 AM2015-10-14T02:12:58+5:302015-10-14T02:12:58+5:30

संत तुकाराम महाराज समाज प्रबोधन संस्था व राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी कलावंताची चक्री भजन स्पर्धा घेण्यात आली.

Chakri bhajan contest | चक्री भजन स्पर्धा

चक्री भजन स्पर्धा

Next

शौकत शेख, डहाणू
डहाणू शहरातील लोणीपाडा ईराणी रोड हा मुख्य रहदारीचा रस्ता अडवून फेरीवाल्यांनी हातगाड्या लावल्याने डहाणूकरांना रस्त्यातून मार्ग काढणे अवघड झाले आहे. भाजी आणि वडे -भजी विकणाऱ्या फेरीवाल्यांनी थेट गाड्या थाटून रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतुकदार आणि रहिवाशांना दररोजच्या भांडणाला तोंड द्यावे लागत आहे.
रिलायन्स थर्मल पॉवर या प्रकल्पाकडे जाण्यासाठी लोणीपाडा येथूनच एकमेव मार्ग आहे. मात्र या मुख्य रस्त्यावरच फेरीवाले बसल्याने पालिकेचा रस्ताच गायब झालेला आहे. एकीकडे जागोजागी पडलेल्या मोठमोठया खड्डयातून वाट काढण्याची कसरत करावी लागत असतानाच फेरीवाल्यांमुळे रहिवाशांचा ये जा करण्याचा मार्ग अडला आहे. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण झाला असून दररोजच्या भांडणांनी लोक त्रस्त झाले आहेत.
डहाणू पोलीस चौकीच्या पाठीमागे डहाणू नगरपालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी महात्मा गांधी भाजी मार्केट ही ५२ गाळयांची स्वतंञ्य इमारत उभारून भाजी विक्रेत्यांचा जागेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. माञ भाजी विक्रेत्यांनी स्वत:च्या मनमानीने मार्केटच्या इमारतीत न बसता मुख्य रहदारीच्या रस्त्यावर जागा अडवून बेकायदा गाडया थाटून अतिक्रमण केले आहे. डहाणू पोलीस ठाणेही यातून सुटले नाही. डहाणू पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडच्या चोहोबाजूंना विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने डहाणूचे पोलीस ठाणेच अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. डहाणू पालिका क्षेत्रातील रस्त्यावरील अतिक्रमणाला नगर परिषदेचे उदासिन धोरणच कारणीभूत असून डहाणूतील विक्रेत्यांचा जागेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात अपयशी ठरली आहे. थर्मल पॉवर रोड, पोलीस ठाण्याच्या आजूबाजूचा परिसर आणि इराणी रोड या भागात भाजी विक्रेत्यांनी जागेअभावी थेट रस्त्यावर उतरून दुकाने थाटल्याने वाहतूक आणि रहदारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. डहाणू नगरपषिदेचे भाजी विक्रेत्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण नाही.या सर्व गदारोळात डहाणूकरांना माञ मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणाच्या दररोजच्या ञासाला तोंड द्यावे लागत आहे.

Web Title: Chakri bhajan contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.