शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तेजस एक्स्प्रेसमधील चाकरमानी चाखतात ठाण्यातील नाश्त्याची चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 01:20 IST

कोकणात जलदगतीने जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधील चाकरमानी नवीन वर्षापासून ठाण्यात तयार होणारा चहा आणि ब्रेकफास्टची चव चाखत आहेत.

पंकज रोडेकर ठाणे : कोकणात जलदगतीने जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधील चाकरमानी नवीन वर्षापासून ठाण्यात तयार होणारा चहा आणि ब्रेकफास्टची चव चाखत आहेत. अशा प्रकारे ऐतिहासिक असलेल्या ठाणे रेल्वेस्थानकात खाद्यपदार्थ लोड होण्याची रेल्वेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.मुंबई ते कोकणातील करमाळी हे ५५२ किमीचे अंतर अवघ्या आठ तासांत कापणारी तेजस एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटते. तसेच दुपारी २ वाजता ती करमाळीला दाखल होते. इतर एक्स्प्रेसप्रमाणे या एक्स्प्रेसमध्येही सुरुवातीला मुंबईतून खाद्यपदार्थ लोड केले जात होते. मात्र, नवीन वर्षात त्यामध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझमने बदल केला आहे. यानुसार, या एक्स्प्रेसमधील सकाळच्या ब्रेकफास्टचा ठेका फूड प्लाझाला तब्बल पाच वर्षांकरिता दिला आहे.ठाण्यात ब्रेकफास्ट, तर रत्नागिरी येथे लंच आणि करमाळीत डीनर गाडीत लोड केले जाऊ लागले आहे. त्यामुळे गाडीत मुंबईऐवजी ठाण्यात तयार होणाºया नाश्त्याची चव चाखता येत आहे. ती आठवड्यातून पाचवेळा या मार्गावर धावते.रेल्वेतील तिकीटधारकांची संख्या निश्चित झाली की, रेल्वे प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराला प्रवाशांच्या मागणीनुसार व्हेज आणि नॉनव्हेज असे खाद्यपदार्थ तयार करण्यास सांगितले जाते. त्यानुसार, तयार झालेले ताजे पदार्थ गाडीत रेल्वेस्थानकात दाखल होण्यापूर्वीच आणले जातात.संबंधित कंत्राटदाराकडे पुरेपूर असलेल्या मनुष्यबळामुळे संबंधितांकडून ते खाद्यपदार्थ १२ डब्यांत अवघ्या ३२ सेकंदांत लोड होतात. या नाश्त्याचे प्रवाशांकडून केलेल्या मागणीनुसारच वाटप होते. त्याचबरोबर आॅर्डरपेक्षा २५ ते ३० पाकिटे अतिरिक्त ठेवून गाडीत होणाºया नव्या मागणीनुसार त्याची पूर्तता केली जाते, असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात येते.>ठाणे स्थानकावरील फूड प्लाझाला पाच वर्षांचा ठेका मिळाला असून तिकीट बुकिंगनंतर रेल्वे प्रशासनाच्या आॅर्डरनुसार ताजे खाद्यपदार्थ तयार करून त्या गाडीच्या प्रत्येक डब्यामध्ये नियोजित वेळेत, म्हणजे अवघ्या ३२ सेकंदांत आॅर्डरप्रमाणे चढवले जात असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

टॅग्स :Tejas Expressतेजस एक्स्प्रेस