ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघ केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षकांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:46 PM2019-09-28T18:46:46+5:302019-09-28T18:53:42+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतलेल्या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने विधानसभांच्या निवडणुकी करीता जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

Central Assembly Election Expenditure Supervisor in the 8 Assembly constituencies in Thane district | ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघ केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षकांच्या ताब्यात

केंद्रीय निवडणूक निरिक्षकांनी दिलेल्या सुचनांचे यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिले.

Next
ठळक मुद्देविना परवानगी कुठलीही सभा, बैठका होणार नाहीप्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्षमद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाने पायबंद घालावा

ठाणे : विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात शनिवारी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक हजर झाले आहेत. त्यांच्या नियंत्रणातील मतदारसंघाच्या उमेदवारांच्या खर्चावर ते बारीक लक्ष ठेवणार आहेत. यास अनुसरून केंद्रीय निवडणूक निरिक्षकांनी दिलेल्या सुचनांचे यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतलेल्या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने विधानसभांच्या निवडणुकी करीता जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये भिवंडी, ग्रा.साठी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून विवेकानंद यांची नियुक्त केली आहे. याप्रमाणच ते भिवंडी पश्चिम , भिवंडी पूर्व या मतदारसंघांचेही काम पाहणार आहेत. तर आशिष चंद्र मोहंती हे शहापूर , कल्याण पश्चिम, मुरबाड मतदारसंघाचे काम पाहणार आहेत. तसेच एस आर कौशिक यांच्यावर अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण(पूर्व.) मतदारसंघाची जबाबदारी आहे. शिव स्वरूप सिंग यांच्यावर डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ठाणे, या मतदार संघाची जबाबदारी आहे. तर उमेश पाठक हे मीरा-भार्इंदर, ओवळा-माजीवाडा, कोपरी- पाचपाखाडी, क्षेत्रात काम पाहणार आहेत आणि के रमेश हे मुंब्रा-कळवा, ऐरोली आणि बेलापूर या मतदार संघांमध्ये कार्यरत राहणार आहेत.
          जिल्ह्यातील १८ मतदारसंघांचा ताबा या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेऊन काही महत्वपूर्ण सुचना या निवडणूक निरीक्षकांनी दिल्या. या सर्व पथकांनी उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची बाब खर्च अहवालात समाविष्ठ होईल याची दक्षता घेण्याच्या सुचना केल्या आहे. पोलीस, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच जिल्ह्यात नेमण्यात आलेले फ्लाईग स्कॉड, व्हीडीओ सर्व्हिलन्स टीम, स्थिर निगराणी पथके यांनी वाहनांची तपासणी करावी. निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सभा, बैठकांची माहिती घेऊन त्यानुसार पथकांची नेमणूक करण्याच्या विषयावर यावेळी चर्चाही करण्यात आली.
        विना परवानगी कुठलीही सभा, बैठका होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी केल्यात. राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या सभा आणि कॉर्नर सभाचे चित्रीकरण करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. व्हडओ पथक व भरारी पथकांना सक्र ीय ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आयकर विभाग आणि लेखा विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन काम करावे. विविध मार्गाने येणाऱ्या मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाने पायबंद घालावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले. विविध समिती प्रमुखांनी यावेळी समित्यांच्या कामाची माहिती दिली. या बैठकीला उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी तसेच समित्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Central Assembly Election Expenditure Supervisor in the 8 Assembly constituencies in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.