शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरच्या पाणीपुरवठा प्रकल्पास केंद्राचे अमृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:53 IST

मीरा-भार्इंदर शहरास होणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पास अखेर केंद्र शासनाच्या अमृत योजनेतंर्गत नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

ठाणे : मीरा-भार्इंदर शहरास होणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पास अखेर केंद्र शासनाच्या अमृत योजनेतंर्गत नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सुर्या पाणीपुरवठा प्रकल्पातून होणारा हा प्रकल्प २०४ कोटी ५५ लाख रुपयांचा असून एमएमआरडीएच्या माध्यमातून तो पूर्ण करण्यास नगरविकास विभागाने १४ जून २०१८ रोजी मंजुरी दिली आहे. येत्या २४ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश असल्यामुळे मीरा-भार्इंदरची पाणीटंचाई काहीअंशी दूर होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिस्स्याचे १०२ कोटी ३८ लाख रुपये एमएमआरडीएला भरण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती केल्याने एकीकडे महापालिकेला दिलासा मिळाला असतांना टक्केवारी आणि ठेकेदारीचे राजकारण करू पाहणाºया काही स्थानिक राज्यकर्त्यांना नगरविकास विभागाने वेसण घातल्याची चर्चा आहे.मीरा-भार्इंदर शहराची पाणीटंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने अमृत अभियानात २०१६-१७ च्या आराखड्यात मीरा-भार्इंदरचा समावेश केला होता. अखेर दोन वर्षांनंतर त्यास नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सुर्या धरणातून होणाºया वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पास यापूर्वीच मान्यता देण्यात आलेली आहे. त्यापाठोपाठ आता मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रकल्पासही मान्यता दिल्याने दोन्ही शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे.>असा आहे प्रकल्पमहापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पात काशीदकोपर ते चेने अशी २१.५२ किलोमिटरची 1829 व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार असून त्यावर १४८ कोटी २८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय चेने येथील २१ कोटी १० लाख रुपये खर्चुन जलकुंंभ बांधण्यात येणार आहे. तसेच पंपिंग स्टेशनसाठी ३१ कोटी ३० लाख आणि पाणीशुद्धीकरण प्रकल्पावर दोन कोटी ९८ लाख व सुर्यानगर येथील कामावर एक कोटी नऊ लाख असे २०४ कोअी ५५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.असे मिळणार केंद्र व राज्याचे अनुदानयानुसार या २०४ कोटी ५५ लाख रुपयांपैेकी अमृत योजनेतंर्गत 33.33% वाटा केंद्र शासन उचलणार असून त्याचे ६८ कोटी २४ लाखांचे अनुदान देणार आहे. तर राज्य शासनाचा वाटा 16.67% असून त्यापोटी ३४ कोटी १३ लाखांचे अनुदान नगरविकास देणार आहे.

टॅग्स :Waterपाणी