शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

रस्त्यावर सोडलेल्या प्राण्यांसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा, कॅप संस्थेचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 00:09 IST

Thane : येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी (येस) व सिटिझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (कॅप)च्या सहकार्यातून जुने वाघबीळ गाव येथे प्रशस्त जागेमध्ये प्राण्यांसाठी  ‘फ्रीडम फार्म’ नावाचे निवारा केंद्र उभारणीचे काम सुरू केले आहे.

ठाणे : रस्त्यावर सोडण्यात आलेल्या किंवा जखमी अवस्थेत आढळलेल्या प्राण्यांवर उपचार करून त्यांना निवारा देणाऱ्या कॅप संस्थेने आपल्या आवडत्या प्राण्यांसोबत व्हॅलेण्टाइन डे साजरा करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला प्रतिसाद देत ठाणे, मुंबईतील प्राणिमित्रांनी व्हॅलेण्टाइन डे आपल्या आवडत्या प्राण्यांसोबत साजरा केला. यात कुत्रा, मांजर आणि गायींचा समावेश होता.येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी (येस) व सिटिझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (कॅप)च्या सहकार्यातून जुने वाघबीळ गाव येथे प्रशस्त जागेमध्ये प्राण्यांसाठी  ‘फ्रीडम फार्म’ नावाचे निवारा केंद्र उभारणीचे काम सुरू केले आहे. व्हॅलेण्टाइन डेच्या निमित्ताने प्राणिमित्रांनी येथील प्राण्यांची भेट घेता यावी व काही काळ त्यांच्यासोबत घालवून मुक्या प्राण्यांप्रति आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने संस्थेने उपलब्ध करून दिली. ‘तुमच्या जोडीदाराला भेटा’ या संकल्पनेद्वारे फ्रीडम फार्मला भेट दिल्यानंतर कोणाला इकडच्या प्राण्यांना स्वतःच्या घरी अथवा संस्थेमध्ये दत्तक घ्यावयाचे असेल तर तीही व्यवस्था या दिवशी करण्यात आली आहे. ज्यांना कोणाला प्रत्यक्ष जागेवर काही कारणाने उपस्थित राहणे शक्य नसेल तर अशा नागरिकांसाठी फ्रीडम फार्मच्या व्हर्च्युअल टूरचेही आयोजन केले होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेचे सर्व उपाय योजून सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते ७ या दरम्यान दोन गटांमध्ये भेट देण्याऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.  जवळपास ५० प्राणिप्रेमींनी आपला वेळ प्राण्यांसोबत घालविला. प्रत्येकाला ४५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यावेळेत त्यांनी आपल्या आवडत्या प्राण्याला खाऊ घातले, त्यांच्यासोबत काही खेळ खेळले. तसेच सेल्फीही काढले. यात कधीही न बरे होणाऱ्या प्राण्यांचा समावेश होता; परंतु त्यांच्यासोबतही ठाणेकरांनी आपला वेळ व्यतीत केला असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशांक तोमर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे