शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सीडीआर प्रकरण : रिझवान सिद्दिकींनी कॉल्स रेकॉर्ड केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:28 IST

कौटुंबिक प्रकरणामध्ये अ‍ॅड. रिझवान सिद्दिकी यांनी आपले कॉल्स रेकॉर्ड केल्याचा आरोप आकृती नागपाल या तेलुगू अभिनेत्रीने सोमवारी पोलिसांकडे केला. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिचा जबाब नोंदवला असून या प्रकरणी तिला साक्षीदार म्हणून वापरले जाणार आहे.

ठाणे : कौटुंबिक प्रकरणामध्ये अ‍ॅड. रिझवान सिद्दिकी यांनी आपले कॉल्स रेकॉर्ड केल्याचा आरोप आकृती नागपाल या तेलुगू अभिनेत्रीने सोमवारी पोलिसांकडे केला. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिचा जबाब नोंदवला असून या प्रकरणी तिला साक्षीदार म्हणून वापरले जाणार आहे.बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने शुक्रवारी रात्री अ‍ॅड. रिझवान सिद्दिकी यांना अटक केली. सिद्दिकी बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे वकील आहेत. ठाणे पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्दिकी, त्यांची पत्नी आणि अ‍ॅड. रिझवान सिद्दिकी यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. सीडीआर प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीकडून सिद्दिकी यांनी बेकायदेशीररीत्या सीडीआर मिळवल्याचा आरोप आहे. नोटीस बजावूनही चौकशीसाठी हजर न झाल्याने पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्यांना अटक केली. ते सध्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत.त्यांचे तीन मोबाइल फोन्स आणि दोन लॅपटॉपमधल्या माहितीचे विश्लेषण सुरू असताना, सोमवारी त्यांच्याविरोधात दोन तक्रारी पोलिसांकडे आल्या. त्यापैकी एक तक्रार आकृती नागपाल या तेलुगू अभिनेत्रीची आहे. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती आणि अ‍ॅड. सिद्दिकी हे मित्र आहेत. २०१४ साली तिच्या पतीने मुंबई न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. तिच्या पतीचे वकीलपत्र अ‍ॅड. सिद्दिकींनी घेतले होते. खटला सुरू असताना एका सुनावणीला अ‍ॅड. सिद्दिकी यांनी एका पेनड्राइव्हमध्ये आपल्या मित्रांसोबतचे काही कॉल रेकॉर्ड न्यायालयामध्ये सादर केले. अ‍ॅड. सिद्दिकींनी आपल्या मोबाइल फोनचा सीडीआर बेकायदेशीररीत्या मिळवला असावा, अशी शंकाही या अभिनेत्रीने व्यक्त केली. या अभिनेत्रीचा जबाब नोंदवण्यात आला असून तिला या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून वापरले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दुसरी तक्रार मुंबईच्या एका व्यापाऱ्याने पोलिसांकडे केली. या व्यापाºयाची दुसºया एका व्यापाºयासोबत व्यवसायामध्ये भागीदारी होती. कालांतराने व्यावसायिक वाद होऊन त्यांची भागीदारी संपुष्टात आली. त्यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट झाल्यानंतर आपण कुणाकुणाच्या संपर्कात आहोत, मोबाइल फोनवर कधी आणि कुणाशी बोललो, हेदेखील अ‍ॅड. सिद्दिकी यांना माहीत असायचे. या व्यापाºयाचा जबाब नोंदवून त्यालाही या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून वापरले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.सीडीआर प्रकरणामध्ये एका तेलुगू अभिनेत्रीसह मुंबईच्या एका व्यापाºयानेही पोलिसांशी स्वत:हून संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांचा या प्रकरणी साक्षीदार म्हणून वापर केला जाईल.- अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त गुन्हे, ठाणे

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा