शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

निकृष्ठ रस्ता तयार करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, राष्ट्रवादीची मागणी, ब्रम्हांड भागातही खचला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 4:28 PM

घोडबंदर भागातील ब्रम्हांड सिग्नल जवळील रस्ता देखील खचल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ज्या ठेकेदाराच्या मार्फत अशी कामे करण्यात आली आहेत. त्याला काळ्या यादीत टाकून रस्त्याच्या कामाची आयआयटी किंवा व्हिजेटीआय मार्फत गुणवत्ता तपासण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

ठळक मुद्देआयआयटी मार्फत रस्त्याची गुणवत्ता तपासाअन्यथा आंदोलनाचा इशारा

ठाणे - घोडबंदर भागात मलनिसारण वाहिन्या टाकण्याच्या कामात झालेल्या हलगर्जीपणामुळे कावेसर आणि आजूबाजूचा पाच किमी पर्यंतचा रस्ता खचल्याची घटना ताजी असतांनाच ब्रम्हांड सिग्नल ते पुढे आझादनगर पर्यंतच्या रस्त्याचीसुध्दा हीच अवस्था झाल्याची बाब समोर आली आहे. परंतु एवढे होऊनही संबधींत ठेकेदावर कारवाई करण्याचे धाडस अद्यापही पालिका प्रशासनाने दाखविले नसल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता आयआयटी आणि व्हिजेटीआय अशा स्वायत्त संस्थेमार्फत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.             घोडबंदर भागात मलनिसारण वाहीन्या टाकण्यात आल्यानंतर अनेक भागात आता रस्ते खचण्यास सुरवात झाली आहे. शनिवारी कावेसार आणि आजूबाजूच्या भागात नवीन रस्ता खचल्याची घटना घडली होती. आता या रस्त्याची त्याच ठेकेदाराकडून तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्याचे काम करण्यात येत आहे. ही घटना ताजी असतांनाच सोमवारी रात्री ब्रम्हांड सिग्नल ते आझादनगर पुढे धर्माचा पाडा या भागातही अशाच प्रकारे रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे. या रस्त्यांचीही आता तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. परंतु ज्या ठेकेदाराच्या चुकीमुळे हे प्रकार घडत आहेत, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन मात्र पुढे धजावत नसल्याचेच दिसत आहे.              दरम्यान अवघ्या दोन ते तीन महिन्यातच हे रस्ते खचले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची व्हिजेटीआय अथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासणी करु न संबधीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे. सदरच्या रस्त्यांची कामे ही इगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने केले असल्याचे समजत असल्याची माहिती परांजपे यांनी दिली आहे. या कंपनीने हा रस्ता किती निकृष्ठ पद्धतीने केला आहे, याचा पुरावा पहिल्याच पावसात मिळाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता व्हिजेटीआय अथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे इगल इन्फ्रास्ट्रक्चरच्याच सुरु असलेल्या कामातील एका खड्ड्यात पडून सचिन काकोडकर या तरु णाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी १९ जूनच्या महासभेत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्याबाबतही कारवाई करण्यात आलेली नाही. संबधींत ठेकेदाराकडून केलेल्या या निकृष्ठ कामांबाबत चौकशी करु न त्याची माहिती लेखी स्वरुपात जाहीर करावी अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठामपा प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस