शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कासकर खंडणीप्रकरण : खंडणीतील सोने उधळले बारबालांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 04:02 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकांनी ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून खंडणीपोटी उकळलेल्या ४० तोळे सोन्यापैकी जवळपास निम्मे सोने खंडणीविरोधी पथकाने हस्तगत केले.

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकांनी ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून खंडणीपोटी उकळलेल्या ४० तोळे सोन्यापैकी जवळपास निम्मे सोने खंडणीविरोधी पथकाने हस्तगत केले. यातील काही सोने त्यांनी बारबालांवर उधळल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.खंडणीप्रकरणी इक्बाल कासकरसह चौघांना खंडणीविरोधी पथकाने गेल्या महिन्यात अटक केली. जागेच्या वादातून खंडणी उकळल्याचे तीन गुन्हे त्यांच्यावर आहेत. ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून या आरोपींनी ४० तोळे सोन्याची खंडणी उकळली होती. त्यापैकी काही सोने आरोपींनी मालाड येथील एका सराफा व्यावसायिकास विकल्याची माहिती पोलिसांना चौकशीदरम्यान मिळाली. त्यानुसार, या व्यावसायिकाकडून आधी १० तोळे आणि आता आणखी १० तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले. खंडणी प्रकरणामध्ये या व्यावसायिकाचा साक्षीदार म्हणून वापर करण्याचा विचार खंडणीविरोधी पथक करत आहे. आरोपींनी काही सोने बारबालांना भेट म्हणून दिल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या बारबालांचा शोध घेणे आणि त्यांच्याकडून सोने हस्तगत करणे पोलिसांसाठी कठीण झाले आहे.दरम्यान, खंडणीप्रकरणी अटकेत असलेला छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर याची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. गंगरला न्यायालयाने यापूर्वी दोन वेळा पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलिसांनी पुन्हा गंगरच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, १२ दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्याचे सांगून आरोपीच्या वकिलांनी विरोध दर्शवला. त्यानुसार, न्यायालयाने गंगरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.छोटा शकीलच्या हस्तकाचा शोध सुरू-पंकज गंगर जवळपास १० वर्षांपासून छोटा शकीलला आर्थिक रसद पुरवत असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. राजस्थान, गुजरातमध्ये त्याचा मटक्याचा मोठा धंदा आहे. तेथून एका अंगडिया कंपनीमार्फत महिन्याचे १२ ते १५ लाख रुपये तो मुंबईत पाठवायचा. तेथून छोटा शकीलचा एक हस्तक प्रत्येक महिन्यात ही रक्कम घ्यायचा. या हस्तकाचा तपशील पोलिसांना मिळाला आहे. मात्र, सध्या तो भूमिगत असल्याने त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Iqbal Kaskarइक्बाल कासकरthaneठाणेPoliceपोलिसCourtन्यायालय