शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाडांच्या अडचणीत वाढ; वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By अजित मांडके | Updated: January 11, 2024 12:18 IST

प्रभू श्रीराम मांसाहारी होते हे वादग्रस्त विधान.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शिर्डी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाने विशेष अधिवेशन पार पडले. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते. असे वादग्रस्त विधान केले. आमदार आव्हाडांनी हिंदू बांधव समाजाचा धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने वरील वादग्रस्त विधान केल्याची तक्रार भाजप प्रदेश उद्योग आघाडी महिलाध्यक्ष सेजल कदम यांनी केली होती. त्या तक्रारीवरून आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वी आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

राष्ट्रवादीच्या विशेष अधिवेशनात आव्हाडांनी प्रभू श्रीराम शाहाकारी नव्हते तर ते मांसाहारी होते असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर आव्हाडांविरोधात तीव्र नाराजी उमटण्यास सुरुवात झाली. यामध्ये राजकीय संघटना नाही तर धार्मिक संघटनांनी त्या वादग्रस्त विधानाबाबत आव्हाडांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे आली. यासाठी पोलीस ठाण्यात संघटनांनी धावही घेतली होती. 

वादग्रस्त विधानानंतर ठाण्यातील आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादी अजित पवार गटाने निषेधार्थ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच धाव घेत त्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. याच्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून महाआरती करण्याचा इशारा दिला. अशाप्रकारे भाजपच्या महिलांनी आंदोलन केले. याचदरम्यान भाजप उद्योग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत, गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले. त्यानुसार आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

होऊ शकतो तीन वर्षांचा तुरुंगवास

कायद्यानुसार जर एखादी व्यक्तीने बोलून किंवा लिखीत स्वरूपात किंवा चिंन्हांद्वारे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या. तर भारतीय दंड विधानाच्या कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच त्याला तीन वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद कायदा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJitendra Awhadजितेंद्र आव्हाड