शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मीरा रोडमध्ये गुडविन ज्वेलर्सविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 1:22 AM

१३१ ग्राहकांची तक्रार : अडीच कोटींहून अधिक फसवणूक; आकडा आणखी वाढण्याची शक्यता

मीरा रोड : बेकायदा योजनांमार्फत प्रलोभन दाखवून मीरा रोडमध्ये गुडविन ज्वेर्ल्सच्या योजनेत गुंतवणूक केलेल्या १३१ ग्राहकांची दोन कोटी ६७ लाख ७६ हजार रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी नयानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर फसवणूक झालेल्यांची संख्या वाढून फसवणुकीची रक्कमही दुपटीने वाढून पाच कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

मीरा रोड येथील अयप्पा मंदिराजवळील शांती विहार इमारतीत गुडविन ज्वेलर्सची शाखा २०१७ पासून सुरू करण्यात आली होती. यामध्येही गुडविनच्या फसव्या योजनांना लोकभुलले. दरमहा हप्ता प्रमाणे १२ हप्ते भरल्यावर तेरावा हप्ता गुडविन ज्वेलर्सकडून भरला जाऊन दागिने खरेदी करण्याचे वा वार्षिक व्याजाचे प्रलोभन आदी योजनांद्वारे ग्राहकांना दिले गेले. गुडविनचे नाव झाले असल्याने लोकांनी मोठ्या संख्येने त्यांच्या योजनांमध्ये गुंतवणूक सुरू केली. पण लोकांना आश्वासनांप्रमाणे केलेल्या गुंतवणुकीवर मोबदला मिळण्यास चालढकल सुरू झाली.१५ आॅक्टोबरपासून तर दुकानच बंद झाले. त्यामुळे ग्राहकांनी तक्रारी नयानगर पोलीस ठाण्यात येऊन देण्यास सुरुवात केली होती. फसवणुकीप्रकरणी मोठ्या संख्येने ग्राहकांचे अर्ज येत आहेत. पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिली.रविवारी पोलिसांनी याप्रकरणी जोसेफ ऐरॉली फर्नांडिस (६५ ) तसेच अन्य १३० जणांच्या फिर्यादीनुसार गुडविन ज्वेलर्सचे चालक -मालक सुनीलकुमार नायर आणि सुधीरकुमार नायर, व्यवस्थापक सुब्रमण्यम मेनन व अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.दुकानाच्या झडतीत काहीच आढळले नाहीपोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुकानाची झडती घेतली असता दुकान पूर्णपणे रिकामी असल्याचे आढळून आले. तर शांतीनगरमध्ये राहत असलेला आरोपी मेनन याच्या घरी पोलीस गेले असता घर बंद होते. फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या तक्रारी वाढतच असून फसवणुकीची रक्कम पाच कोटींच्या घरात जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Goodwin Jewellersगुडविन ज्वेलर्सthaneठाणे