शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत दीड वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूस जबाबदार ठरवत पालिका ठेकेदार आणि कनिष्ठ अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: November 5, 2022 20:43 IST

Bhiwandi: भिवंडी शहरातील नारपोली अजमेर नगर परिसरात राहणारा प्रथमेश कमलेश यादव या अठरा महिन्याच्या चिमुरड्याचा २३ सप्टेंबर रोजी घरासमोरील झाकण नसल्याने उघड्या असलेल्या गटारीत पडून दुर्देवी मृत्यू झाला होता

- नितीन पंडितभिवंडी  -  भिवंडी शहरातील नारपोली अजमेर नगर परिसरात राहणारा प्रथमेश कमलेश यादव या अठरा महिन्याच्या चिमुरड्याचा २३ सप्टेंबर रोजी घरासमोरील झाकण नसल्याने उघड्या असलेल्या गटारीत पडून दुर्देवी मृत्यू झाला होता.या प्रकरणी नारपोली पोलिसांनी चौकशी अंती या दुर्दैवी मृत्युस भिवंडी महानगरपालिकेचे संबंधित ठेकेदार व  त्यांच्या कामावर लक्ष ठेवणारे स्थानिक प्रभाग समितीचे कनिष्ठ अभियंता यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बांधकाम ठेकेदार मुक्तदौर बुबेरे,सब कॉन्ट्रॅक्टर प्रविण सूर्यराव व प्रभाग समिती क्रमांक तीन चे कनिष्ठ अभियंता वसीम शेख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

अजमेर नगर येथील कमलेश कृष्णकुमार यादव   यांचे घरासमोरील गटाराचे बांधकाम करणारे ठेकेदार अभियंता यांनी गटाराच्या नालीचे बांधकाम पूर्ण केले परंतु त्यावर आर.सी.सी. चेंबर लादी न बसवल्यामुळे काही लोक यापूर्वी त्यात पडुन किरकोळ जखमी झाले होते.बांधकाम ठेकेदार यांना नागरिकांनी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे याची जाणीव करून दिली होती.मात्र त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले होते.त्यामुळे ठेकेदार,उप ठेकेदार व कनिष्ठ अभियंता यांनी  जाणीपूर्वक कामाकडे दुर्लक्ष केल्याने त्याचे निष्काळजीपणामुळे प्रथमेश यादव याचा अजमेरनगर येथील उघड्या गटारामधील पाण्यात पडुन मरण पावलेला आहे असा निष्कर्ष पोलीस तपासात काढल्या नंतर प्रथमेश याच्या मरणास या तिघांना जबाबदार धरीत त्यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेत पालिका ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे .

टॅग्स :bhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी