शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कर्जतमधील टीएमसी कंपनीच्या 21 संचालकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 07:41 IST

४,१५७ ग्राहकांची केली फसवणूक; स्वस्त घरांचा प्रकल्प अद्याप अपूर्ण

- विजय मांडेकर्जत : तालुक्यातील नगरपरिषद हद्दीतील आकुर्ले आणि शिरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गृहप्रकल्प साकारणाऱ्या टीएमसी म्हणजे तानाजी मालुसरे सिटी या कंपनीवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेलट्रेक्स हौसिंग कंपनी आणि गोपी रिसॉर्टतर्फे हा प्रकल्प उभारण्यात येणारा हा प्रकल्प आजतागायत तो पूर्ण झाला नाही. त्यामुळे यात गुतवणूक करणाऱ्या ४,१५७ ग्राहकांच्या फसवणूकप्रकरणी कंपनीच्या २१ संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. २००८ साली गोपी रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आकुर्ले येथील १०४ एकर जमिनीवर घरे बांधणार होती. तानाजी मालुसरे सिटी या नावाने गृहप्रकल्प सुरू केला होता. गोपी रिसॉर्ट कंपनीबरोबर भागीदारीत तानाजी मालुसरे सिटी उभी केली जात असताना  भागीदारीत वाद निर्माण झाले होते. २००८ ते सन २०१९ यादरम्यान तेथे घर घेण्यासाठी ४२५७ लोकांनी नोंदणी करत जवळपास १३५ कोटींची गुंतवणूक केली होती, तर कंपनीने प्रकल्प उभा करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडले नसल्याने आता कंपनीवर १९१ कोटींचे कर्ज आहे. शिवाय २०१९ पर्यंत शेलट्रेक्स कंपनीने जमीन गहाण ठेवून त्यावर विविध खासगी वित्त संस्थांकडून १८० कोटींचे कर्ज घेतले आहे. असे एकूण ३५० कोटींचे कर्ज या जमिनीवर घेण्यात आले असून प्रकल्प मात्र आजतागायत उभा राहिलेला नाही. सन २०११ ते २०१३ या कालावधीत ४ मजली बांधकाम असलेल्या २२ इमारती उभ्या केल्या आहेत, परंतु त्यांचे बांधकाम निकृष्ट असल्याने तेथील ८०० फ्लॅटमध्ये केवळ १६७ लोक राहायला गेले होते.तानाजी मालुसरे सिटीमध्ये घर घेण्यासाठी पैसे भरलेल्या २४७ ग्राहकांनी अलिबाग येथील ग्राहक संरक्षण कक्षाकडे, तर काही ग्राहकांनी मुंबई हुतात्मा चौक येथील ग्राहक आयोगाकडे दाद मागितली होती. मात्र २०१७ पर्यंत कंपनीने घरांसाठी पैसे भरणाऱ्या कोणत्याही ग्राहकांची रक्कम परत दिली नाही, उलट त्यांच्या घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते मात्र बँकेकडून जात होते. कारवाई झालेले २१ संचालक...कर्जत पोलीस ठाण्यात याप्रकरणी १० ऑगस्टला गोपी रिसॉर्ट प्रा. लि., तानाजी मालुसरे सिटी, शेलट्रेक्स प्रा. लि. कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात या कंपन्यांचे संचालक एबॉय मॉरिशस, गणेश राजेश कृष्णन, जोसीलव्हा, डी. के. मधुकर, उदयसिंग वाळुंज, हाफिज सौरभ काँट्रॅकटर, संदीप सिंग, सुरेश सिंग, अरुण अतलेकर, मुरारी दिनेश मुनीम, अनिल पांडुरंग कांबळे, जिनेंद्रक कण्हय्यालाल नाहर, सुनील विश्वनाथ, रवींद्र रमेश सिनकर, कीर्ती मलगौडा तिमन्नागौदर, अनिल पांडुरंग शिंदे, अनिल सुभाष सावंत, अमेय गणेश पाटील, मुकेश रुद्दल पटेल अशा एकूण २१ संचालकांचा समावेश आहे.माझ्या मित्राने स्वस्तात घर मिळते म्हणून  घरे बुक केली होती, मात्र त्यांची सर्वांची फसवणूक झाली होती. आता गुन्हा दाखल केल्याने न्याय मिळू शकतो याची खात्री वाटत आहे.- उदय पाटील, कर्जत