शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजी अधिकाऱ्यास अभय का? मैदानावर दफनविधीप्रकरणी मनसेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 01:04 IST

वर्तकनगर येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडावर काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्मियांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना घडली होती. ही बाब निंदनीयच आहे.

ठाणे : वर्तकनगर येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडावर काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्मियांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना घडली होती. ही बाब निंदनीयच आहे. परंतु, तेवढीच चूक ही त्या जागेबाबत निष्काळजीपणा बाळगणा-या महापालिका अधिकाऱ्यांचीही आहे. यामुळे त्यांच्याविरोधात प्रशासन कोणती कारवाई करणार? असा सवाल मनसेने केला आहे.मैदानासाठी आरक्षित भूखंडात अनधिकृतरित्या दफनविधी केल्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे असा आरोप मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला. याबाबत संबंधितांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. या जागेचा टीडीआर हिरानंदानी विकासकाला मिळाल्याने खेळाचे मैदान ठामपाच्या मालकीचे आहे. त्यामुळे त्याची देखभाल करणे, भोवती कुंपण घालून त्याची काळजी घेणे हे पालिकेच्या संबंधित अधिकाºयांचे कर्तव्य आहे. मात्र, त्यांच्या या निष्काळजीपणामुळे दफनविधी सारखा भयंकर प्रकार घडला. ज्या अधिकाºयांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे तेदेखील दफनविधी करणाºयांएवढेच दोषी आहेत असे ते म्हणाले.तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी ख्रिश्चन धर्मीयांना लेखी पत्राद्वारे ३० हजार चौ. फूट क्षेत्र स्मशानभूमीकरीता देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्यास संबंधित अधिकारी वर्ग, श्रेय घेण्यासाठी पुढेपुढे करणारे लोकप्रतिनिधीअकार्यक्षम ठरले आहेत. सर्वधर्मीयांना अंत्यविधीकरिता जागा उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य आहे.

टॅग्स :MNSमनसे