शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

नशेसाठी वापरला जाणारा कफ सीरपचा साठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:16 IST

पोलिसांनी ही कार थांबवून पाहणी केली असता, खाकी रंगाच्या एका बॉक्समध्ये आर. सी. कफ सीरपच्या १४४ बॉटल्स आढळल्या.

ठाणे : नशेसाठी वापरला जाणारा कफ सीरपचा साठा ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री हस्तगत केला. या प्रकरणी जोगेश्वरी येथील एका रहिवाशास अटक करण्यात आली.ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इटरनिटी मॉलजवळ एका कारमधून कफ सीरपचा साठा येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ ला सोमवारी रात्री मिळाली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांच्या पथकाने सापळा रचला. रात्री ९ च्या सुमारास या पथकास पोपटी रंगाच्या एका कारवर संशय आला. पोलिसांनी ही कार थांबवून पाहणी केली असता, खाकी रंगाच्या एका बॉक्समध्ये आर. सी. कफ सीरपच्या १४४ बॉटल्स आढळल्या. हा साठा जोगेश्वरी येथील श्रवण चौधरी याच्या ताब्यात होता. पोलिसांनी विचारपूस केली असता, औषध बाळगण्याचा त्याच्याजवळ कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. नशेसाठी या औषधाची विक्री होत असून, आरोपीने त्यासाठीच हा साठा बेकायदेशीरपणे मिळविला असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून औषधाचा साठा, मोबाइल फोन आणि औषधाच्या वाहतुकीसाठी वापरलेली कार असा ३ लाख १७ हजार ६८0 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.बनावट औषधाचा संशयआरोपीकडून हस्तगत केलेला कफ सीरपचा साठा सिप्ला कंपनीचा आहे. पाहणीत, सिप्ला कंपनीचे औषध आणि आरोपीजवळून हस्तगत केलेले औषध यामध्ये तफावत असल्याचे प्रथमदर्शनी आढळले. औषधाची पडताळणी करण्यासाठी जप्त औषधाचा नमुना सिप्ला कंपनीकडे पाठवणार आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ