शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या लसीकरणाचे भांडवल, भाजपने केली शहरभर पोस्टरबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:27 IST

हा कोरोनायोद्ध्यांचा अपमान : डॉक्टरला लस नाकारल्याने टीका

ठाणे  : महापौर नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या कोरोना लसीवरून राजकारण तापले आहे. भाजपने शहरभर पोस्टरबाजी करुन महापौरांवर टीका केली आहे. कोरोनायोद्ध्यांना लस देणे  गरजेचे असताना महापौरांचे लाड कशासाठी, असा सवाल या पोस्टरद्वारे केला आहे. दुसरीकडे एका डॉक्टरला मुदत संपल्याचे सांगून लस न देता पिटाळून लावल्याचा प्रकारही समोर आल्याने भाजपच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे.

ठाणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौर म्हस्के यांनी स्वत: लस घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी घेतलेली लस म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप भाजपने केला आहे. लस सुरक्षित आहे हे सर्वांना समजण्याकरिता ती घेतल्याचा महापौरांचा दावा आहे. मात्र, याबाबत सरकारी आदेश दाखवणार का, असा सवाल करून भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी थेट केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांचे या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. 

ठाणे  शहराला पुरवठा केलेली लस सत्तेचा गैरवापर करून आणखी कोणाला दिली आहे का, नक्की किती फ्रंटलाइन वर्कर्सना ती मिळाली, याची चौकशीची मागणी केली आहे. भाजप एवढ्यावरच थांबला नसून त्याने पोस्टरबाजी करून महापौरांवर हल्लाबोल केला आहे. हे पोस्टर महापालिका मुख्यालयासमोरच लावल्याने अनेकांच्या नजरा त्यावर खिळल्या. 

कोरोनायोद्धे ठाण्याचा अभिमान, त्यांना सर्वप्रथम लस मिळणे  हा त्यांचा अधिकार, सेना आमदार, महापौरांनी लाइनीत घुसून त्यांचा केला अपमान अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर आहे. शिवसेना -राष्ट्रवादी भाऊ भाऊ, दोघे मिळून जनतेच्या पैशांवर मजा मारू, असा आशयही पोस्टर झळकत आहे.

पोस्टर्स काढण्याची महापालिकेची लगीनघाई,  इतर पोस्टर्स दिसले नाही का - भाजपचा सवाल

ठाणे  : महापौर म्हस्के यांनी घेतलेल्या कोरोना लसीबाबत भाजपने शहरभर लावलेले पोस्टर अवघ्या काही तासांतच काढण्याची लगीनघाई शुक्रवारी महापालिकेने केली. यावरून भाजपने सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. शहरात सर्वत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत पोस्टर असतानाही हेच पोस्टर कसे दिसले, असा सवालही भाजपने केला. 

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेले अनधिकृत पोस्टर आजही उतरविण्यात आलेले नाहीत. त्याकडे महापालिकेच्या या विभागाचे लक्ष गेलेले नाही. परंतु, सत्तेची मगरुरी आलेल्या शिवसेनेला मात्र आम्ही लावलेलेच पोस्टर दिसले असून, महापालिकेनेदेखील ते उतरविण्यासाठी लगीनघाई केल्याने आश्चर्य वाटत असल्याची टीका भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस