शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्यास अटक: ५७ हजारांचा गांजा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 23:57 IST

ठाण्यात गांजाची तस्करी करणा-या दीपक दत्ता मोहिते (५२, रा. पनवेल, जि. रायगड) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने सोमवारी अटक केली. त्याला ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यात गांजाची तस्करी करणा-या दीपक दत्ता मोहिते (५२, रा. पनवेल, जि. रायगड) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने सोमवारी अटक केली. त्याच्याकडून ५७ हजारांचा चार किलो ९२० ग्रॅम गांजा आणि रोकड असा ६९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दीपक हा त्याच्या अन्य एका साथीदारासह उथळसर येथील एमटीएनएल कार्यालयासमोर गांजाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार रवींद्र काटकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ आॅक्टोबर रोजी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आणि हवालदार रवींद्र काटकर यांच्या पथकाने सापळा रचून दीपकला महानगर टेलिफोन निगमच्या उथळसर येथील कार्यालयासमोर ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये ५७ हजारांचा गांजा, रोकड आणि इतर साहित्य असा ६९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम ८-क, २०-ब, २९ नुसार राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपकला ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीraidधाड