शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार आज उभारणार निवडणूक प्रचाराची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 05:02 IST

शोभायात्रांमध्ये सहभाग : देशभक्तीच्या थीमवर प्रचार

ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर आदी शहरांमध्ये आयोजित स्वागतयात्रा, शोभायात्रांमध्ये सहभागी होऊन बहुतांश उमेदवार आपल्या निवडणूक प्रचाराची गुढी उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा सोहळा राजकारणविरहित असला तरी माहोल निवडणुकीचा असल्याने उमेदवार लोकांमध्ये मिसळून आपला संदेश अप्रत्यक्षपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, असेच संकेत प्राप्त होत आहेत. त्यातच, या सोहळ्याच्या आयोजकांनी बहुतांश शहरांमध्ये देशप्रेमाशी जोडून अनेक उपक्रम आयोजित केल्याने सध्या निवडणूक प्रचारात अग्रेसर असलेला राष्ट्रवादाचा मुद्दा येथेही पुढे राहणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीला डोंबिवलीतील गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत तत्कालीन उमेदवार सहभागी झाले होते. त्यामुळे उद्याही ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे उमेदवार हे शोभायात्रांमध्ये सहभागी होतील, अशी चर्चा आहे. काही उमेदवारांनी शोभायात्रांमध्ये सहभागी होण्याचे वेळापत्रक आखले आहे. या शोभायात्रांमध्ये सहभागी होणाऱ्या लक्षावधी लोकांच्या भेटीगाठी घेण्याची उमेदवारांकरिता ही मोठी संधी असते. त्यामुळे बहुतांश उमेदवार ती दवडणार नाहीत, असे संकेत प्राप्त होत आहेत. आचारसंहितेमुळे अशा सोहळ्यांमध्ये थेट प्रचार करणे शक्य नसले, तरी अप्रत्यक्ष प्रचार केला जाऊ शकतो. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात चाळीसहून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर, भारतीय लष्कराने बालाकोट येथील दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले. या मुद्द्यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्षात दावे-प्रतिदावे व आरोप-प्रत्यारोप सुरू असले, तरी बहुतांश शोभायात्रा आयोजकांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद हीच थीम घेतली आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या दीपोत्सवानिमित्तही एक पणती सैनिकांकरिता, अशी संकल्पना राबवली गेली. उद्याच्या शोभायात्रा, स्वागतयात्रांमधील चित्ररथ हे सैन्याच्या शौर्यगाथांवर प्रकाश टाकणारे असतील. त्यामुळे उमेदवार आपल्या प्रचाराकरिता हा राष्ट्रवादाचा मुद्दा खुबीने वापरतील, असे संकेत प्राप्त होत आहेत.निवडणूक आयोगाची राहणार नजरगुढीपाडव्याच्या मिरवणुकांमध्ये उमेदवार व त्यांचे समर्थक सहभागी होणार असल्याने निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी या मिरवणुकांवर बारीक नजर ठेवणार आहेत. तसेच पुलवामाच्या घटनेनंतर अनेक प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा इशारा गुप्तचर संघटनांनी यापूर्वीच दिला असल्याने पोलीस बंदोबस्त चोख असणार आहे. मिरवणुकीत सहभागी होणाºया नागरिकांनी सणाचा आनंद घेताना सतर्क राहावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेthane-pcठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक