शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांचे निघाले घामटे, प्रभाग समिती कार्यालयात उमेदवारांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:24 IST

निवडणूक कर्मचारी कामाच्या बोजामुळे कावले...

ठाणे : बंडखोरी टाळण्याकरिता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर न करता सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दुपारपर्यंत एबी फॉर्मचे वाटप सुरू ठेवल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता वेगवेगळ्या शहरांत केलेल्या यंत्रणेवर कमालीचा ताण आला. दुपारी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल करायला गेलेले उमेदवार रात्री अर्ज भरून बाहेर पडले. या काळात अनेकांना घोटभर पाणी मिळाले नाही. प्रचंड गर्दी असल्याने बसायला जागा नव्हती. रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करून घेण्याचे काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचे व मुख्यत्वे महिला कर्मचाऱ्यांचे कमालीचे हाल झाले. 

एबी फॉर्म मिळण्यासाठी उमेदवार रात्रभर पक्षाच्या कार्यालयात ताटकळले. शिंदेसेनेने दुपारी दीड वाजेपर्यंत उमेदवारांना एबी फॉर्मसाठी थांबवले होते. एबी फॉर्म हाती पडल्यानंतर पोलिसांच्या सल्ल्याने अनेकांनी शक्तिप्रदर्शनाच्या मिरवणुका काढल्या. एकाचवेळी एकाच प्रभागातील प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार नाही, याची खबरदारी पोलिसांना घ्यावी लागली. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयांच्या ठिकाणी गर्दी झाली. 

उमेदवार रांगेत ताटकळलेज्यांना रात्री अर्ज मिळाले, त्यांनी सकाळीच प्रभाग समितीचे कार्यालय गाठले. वाजत-गाजत, फटाके फोडत अर्ज भरले. परंतु एकाच दिवशी शेकडो उमेदवार अर्ज भरण्यासाठी आल्याने निवडणुकीचे कामकाज पाहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे    हाल झाले. 

अनेकांना दुपारचे जेवण घेता  आले नाही. हापालिकेच्या माध्यमातून पाणी किंवा बसण्याची व्यवस्था नसल्याने उमेदवारांना रांगेत तीन ते पाच तास ताटकळत उभे राहावे लागले. 

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेने वेगवेगळ्या प्रभाग कार्यालयांत अर्ज दाखल करण्याची व्यवस्था केली. महायुती आणि महाविकास आघाडीने शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्मचे वाटप करण्याचे टाळून महापालिकेची व्यवस्था कोलमडवली. 

अनेक ठिकाणी वादावादीदुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार होते; पण अर्ज दाखल करणाऱ्यांची इतकी गर्दी झाली की, रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करणे सुरू होते.

वर्तकनगर भागातील जिम्नॅस्टीक सेंटरमध्ये असलेल्या निवडणूक कार्यालयात उमेदवारांचा लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. याठिकाणी पंख्याची, पाण्याची किंवा बसण्याची सुविधा नव्हती. 

काही उमेदवार आपल्या लहान मुलांना घेऊन आले होते. त्यांचे याठिकाणी हाल झाले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या एकेका उमेदवाराला अर्ज दाखल करण्याकरिता तासन् तास लागले. काही ठिकाणी अतिशय संथपणे काम सुरू असल्याचा फटका उमेदवारांना बसला. काही ठिकाणी उमेदवारांचे समर्थक व निवडणूक कर्मचारी यांचे वाद झाले.

अर्ज दाखल करताना झाली दमछाक पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस असतानाही निवडणूक लढवणाऱ्या एकाही राजकीय पक्षाकडून त्यांच्या अधिकृत उमेदवारांची यादी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाली नाही.

मनसेने मात्र कल्याण, डोंबिवलीतील ४९ उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी ती अपूर्ण होती. मनसेच्या यादीत भाजप आणि शिंदेसेनेकडून ज्या माजी नगरसेवक, पक्षाच्या प्रबळ दावेदारांना उमेदवारी नाकारण्यात आली.

 अशा दोन्ही पक्षांतील अनेक उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारची गडबड आणि गोंधळाची राजकीय परिस्थिती यापूर्वी कधीच झाली नाही.

४९ उमेदवारांची यादी मनसेने जाहीर केली.  मनसेच्या यादीत भाजप आणि शिंदेसेनेकडून ज्या माजी नगरसेवक, पक्षाच्या प्रबळ दावेदारांना उमेदवारी नाकारण्यात आली.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Chaos as Candidates Rush to File Nomination Forms for Elections

Web Summary : Nomination filings saw chaos due to delayed party form distribution. Candidates faced long waits, lack of facilities, and arguments amid heavy crowds. The municipal corporation system was overwhelmed.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026